˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

दर्शन

दर्शन
   जगद्गुरू तुकोबाराय यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे.जगद्गुरू तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचे दर्शन घ्यायला आळंदी क्षेत्री आले होते.समाधीजवळच पक्षी दाणे टिपत होते.तुकोबारायांनी समाधीला साष्टांग नमस्कार घातला,तसे सगळे पक्षी भुर्रकन उडून गेले.तेव्हा त्यांना कळून आले की मला देवाचे चतुर्भुज दर्शन झाले म्हणजे मला देवाने फसवले.कारण जर मला सर्वत्र हरि-दर्शन झाले आहे सर्वाभूती प्रेम आहे तर या पक्ष्यांना माझी भीति का वाटावी ? त्यांना पक्ष्यांना माझी भीती वाटाली त्याअर्थी देवाने मला ठकविले हे नक्की.नंतर जगद्गुरू तुकोबारायांनी त्याच ठिकाणी नामस्मरण करीत ताठ उभे राहून अनुष्ठान मांडले.अंतःकरणात प्रेम आणि करूणा भरलेल्या स्थितीत जवळपास तीन दिवस उभे राहिल्यानंतर मग,उडून झाडावर जाऊन बसलेले पक्षी त्यांच्या खांद्यावर येऊन बसले तेव्हा,तुकोबारायांचे समाधान झाले.
प्रसंग संपला सिद्धांत पाहूया,जगद्गुरू तुकोबारायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेला आपल्या अखंड नामस्मरणाच्या अनुष्ठानाच्या तपाची test चाचणी लावली.शंख-चक्र-पद्मधारी रूपातील भगवंतांचे दर्शन होणे हे खरे दर्शन नाही.भगवान् पांडुरंग परमात्म्याच्या कृपेची कसोटी म्हणजे,तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचे तर, *माझी कोणी न धरू शंका।ऐसें हो कां निर्द्वद्व।तुका म्हणे जें जें भेटें।तें तें वाटे मी ऐसें।* जेव्हा मला जें जें भेटेल तें तें माझेच रूप आहे असे वाटेल तेव्हा मला स्पष्ट दर्शन झाले आणि पांडुरंगाची कृपा झाली असे मी समजेन,असे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात.यालाच आत्मदर्शन ही संज्ञा आपण देऊ शकतो.

या तर मग समाधी सोहळ्याला....म्हणजे आळंदीला....
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment