˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात
  संस्काराचा जोर कमी करण्यासाठी दोन प्रकारच्या साधना सागितंल्या जातात
त्यातील एक साधना म्हणजे झोपण्याच्या पुर्वी ईश्वरी स्मरण करावे
कारण
जी गोष्ट झोपता झोपता तिव्रतेने स्मरण केली जाते ती गोष्ट जागे होता क्षणीच पुन्हा लगेचच आठवते
इतर संस्कारही आठवतात
परंतु
काही कालावधी नंतर
रात्री अपरात्री कधीही झोपा
मात्र झोपण्याच्या पुर्वी दोन मिनिटे,तिन मिनिटे वा पाच मिनिटे
जितके शक्य होईल तितके तळमळीने ईश्वर स्मरण करावे
यालाच संधीकाळ असे म्हणतात
सायंसंध्या व प्रातसंध्या हि ईश उपासना वेद परंपरेत आली आहे
या प्रार्थनेचा हेतु इतकाच की ईश्वरी स्मरणात संसारा शांत झोप लागेल
विकारांचा वेग आपल्याला रात्री अपरात्री उठविणार नाही
आणि
सकाळी उठल्या उठल्या ईश्वरी स्मरण सुरु होईल
जीवनात नवी दिशा मिळेल
ईश्वराची साथ जीवनात मिळाल्यावर मायेशी लढण्याची ताकत व हिम्मत येईल
म्हणून
निदान कुसंस्काराना दुर्बल करण्यासाठी झोपतानाच ईश्वरी प्रार्थना करावी
म्हणजे निदान तो सकाळी आपल्याला उठवेलच हा आत्मविश्वास तरी वाढू लागेल
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment