˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

वेधिले वो मन तयाचिये गुणी

वेधिले वो मन तयाचिये गुणी
गुण व लावण्य तसे सर्वातच एक ना एक असतातच
इद्रांजवळ लावण्य आहे पण गुण काय?
अहिल्येच्या मागे धावतो
चंद्र लावण्यवान पण गुण काय तर म्हणे काळा.
कैकयी अती लावण्यवती पण गुण कोनता?
नवरा वैकुंठाला अन राम वनवासाला.
असंही म्हणतात
बहुतेक आजही अनेक दशरथ रूपालाच भाळतात
गुण पहायला वेळ आहे कुणाला?
दश इंद्रियावर हा मानव रथ चालतो तो दशरथ
या शरीरातला आत्माराम वनवासाला गेला तर हा दश इद्रियांचा दशरथ जीवंत राहिल?
कैकयीच्या लावण्याला भुलून दशरथ मेला.
लावण्य व दैवी गुण याचा सुंदर समन्वय म्हणजे भगवान परमात्मा
यांच्याकडे यश ,श्री,औदार्य,ज्ञान,वैराग्य व ऐश्वर्य हे गुण आहे
परमात्मा जगतातील अती सुंदर वस्तू आहे
प्रभू श्री रामाचे अगणित लावण्य पाहिल्यावर अनेक ऋषीमुनीं भुलले
भगवान श्रीकृष्णांची रासलीला बघून भगवान शिवजी ही मोहीत झाले
जन्मताच संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य रंभेचे लावण्य बघून जराही विचलीत झाले नाहीत

पण भगवान श्रीकृष्णाच्या लावण्याला भुलले
जीथे देवाधीदेव महादेव भुलले तिथे संत महात्म्येही भगवंताच्या रूपालाच मोहीत झाले
माऊली ज्ञानोबाराय एक निर्गुण निराकार योगी
जेंव्हा पढंरपुरातील श्रीविठ्ठलाचे अलौकिक असे सावळे स्वरूप पाहिले तेव्हा माऊली म्हणतात
*वेधिले वो मन तयाचिये गुणी!क्षणभरी न विसंबे विठ्ठल रूक्मिनी!!*
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment