˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

उरले ते हरि तुम्हां समर्पण

उरले ते हरि तुम्हां समर्पण
गीता मनुष्याला सांगते
शनैः शनैः उपरमेत्
आता धिरे धिरे उपराम होणे आवश्यक आहे
काल सारखा पुढे जातोय
तो तर कुणासाठीच थांबत नाही
आपल्या जीवनातील बरेच दिवस गेले
आता थोडेच तर उरलेय
गेलेल्या जीवनात अनेक विषयांचा स्पर्श झाला
अनुभव काय आला?
कोणताही आनंद विषयात मिळाला नाही
मनाला जरा समजावा
आता बस की?
हजारो प्रकारच्या स्वरांचा भोग कानाने घेतला
हजारो मन अन्नाची विष्टा केली
अनंत सुवास घेतले
शिल्लक काय उरले?
वेगवेगळ्या नरम गरम गाद्यावर झोपून स्पर्श विषय अनुभवला
यातला कोणता भोग जीवनात स्थिर राहीला?
अस मनाला थोडे थोडे समजवायला हवे आता
कारन

क्षणभंगुर नाही भरवसा
थोडेसे पुर्वपुण्य आहे म्हणून येथवर आलात
आता
व्हारे सावध तोड़ा माया आशा
उद्या त्रिपुरारी पौर्णिमा झाली की हे संताचे जीवाला सावधान करणारे शब्दही कुठे ऐकायला मिळेलच हे सांगता येत नाही
परमात्मा उदार आहे
तो आपल्याला नक्कीच क्षमा करील
माऊली तर म्हणतात
झड़झड़ोणी वहिला निघ!भक्तीचिये वाटे लाग!तरीच पावसी अव्यंग!निजधाम माझे!!
झाले गेले त्याचा विचार सुद्धा करू नका
फक्त म्हणा
उरले ते हरि तुम्हां समर्पण
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment