˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

सुखाचा निधि सुख-सागर जोडला

सुखाचा निधि सुख-सागर जोडला।म्हणोनि काळा दादुला मज पाचारी गे माये।१।
प्रेम नव्हाळी मज जाली दिवाळी।कान्हो वनमाळी आले घरा गे माये।२।
बाप रखुमादेवी-वरू पुरोनि उरला।सबाहेजु भरला माझे हृदयीं गे माये।३।
आनदांचा तो ठेवा,तो आनंद-समुद्र माऊली म्हणतात आजा मला परिपूर्ण वश झालेला,आहे.म्हणून गमंत अशी,आहे की,मी त्याच्याकडे जाण्याऐवजी तोच माझ्याकडे येऊन मला,आवाज देत आहे.माऊली म्हणतात आज खरोखरीच मला दिवाळी आहे.प्रेमाची केवढी नवलाई सांगावी की,संसाराचा रंगच ज्याला कधी लागला नाही आणि संसाराच्या गावाबाहेरच ज्याचा नेहमी राबता तो आज माझ्या घराला आलेला आहे.नुसता आलाच नाही तर त्याने येऊन सारें घर व्यापिलें आहे.आणि तरीहि माऊली म्हणतात शेवटी माझी अशी अवस्था झाली की,माझें हृदयच त्याने अंतर्बाह्य भरून टाकले आहे.
संतांच्या अभंगाची उंची आपण काय वर्णावी माऊलींनी अनुभवलेली अवस्था आपण कधी अनुभवायची? ही संतांची दिवाळी पंढरपूरात आता हजर वारकरी अनुभवत असतील यात शंका नाही.

जय मुक्ताई
संग्रहीत चिंतन
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment