˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

अमृतत्व

अमृतत्व
महर्षी याज्ञवल्कजींना दोन पत्नी होत्या.
एक कात्यायणी व दुसरी मैत्रेयी
यात कात्यायणी ही सामान्य संसारी स्री होती.
तर मैत्रेयी हि प्रगल्भ विचाराची स्री होती.
याज्ञवल्कजी संन्यास घेण्यासाठी निघाले असता त्यांनी आपले धन दोन्ही पत्नीमध्ये समान वाटण्याचे ठरविले.
कात्यायनी ऐहिक सुखासाठी धन पसंत करून संतुष्ट झाली.
परंतु
मैत्रेयीने याज्ञवल्कजींना विचारले
हे भगवन्!
पृथ्वीवरील सारे धन मला मिळाले तर मी अमृतयुक्त अशी सुखी होईल का?
तेंव्हा याज्ञवल्कजी म्हणाले
धनाने अमृतत्व प्राप्त होईल अशी आशा नाही
संसारातील दुःखातुन मुक्त व्हावयचे म्हणजे अमृतत्व म्हणजेच मोक्षप्राप्ती झाली पाहिजे
ते खरे सुख.
तेंव्हा मैत्रेयी म्हणाली
मग अशा धनाचे मी काय करू?मला ज्यामुळे अमृतत्व मिळेल ते ज्ञान द्यावे
हे ऐकून ऋषीवर आनंदी झाले
अमृतत्व म्हणजे आध्यात्मिक सुख.
परमानंद,परमशांती,मोक्षप्राप्ती होय.
बाह्यसुखापेक्षा इद्रियंगम्य अंतःसुखाची व आध्यात्मिक सुखाची योग्यता कधिही श्रेष्ठच.
म्हणून
अमृतत्वस्य तु न आशा अस्ति वित्तेन!!


No comments:

Post a Comment