˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

जन्म साता वरिन

जन्म साता वरिन
श्रुत्वागुणान्भुवनश्रुण्वताते निर्विष्यकर्णविवरैः हरतैगतापः !!
अशी गुणवान व अलौकिक गुण असलेली भुवन सुदंरी रूक्मिनीमाता 
हिने भगवान श्रीकृष्ण परमात्माचे सुदेव ब्राह्मणाच्या मुखातुन नुसते गुण ऐकले तरी रूक्मिनीमातेचे त्रिविधताप गेले
भगवान परमात्माचे मुख जरी पाहिले तरी सकल पुरूषार्थाचा लाभ होतो
रूक्मिनीमातेने भगवंताचे गुणानुवाद ऐकले तर श्रीकृष्ण प्रेम द्विगुणीत झाले
रूक्मिनी मातेला भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या दर्शनाचे वेध लागले
भक्तीत जर भगवंताचे खरे वेध लागले चिंता,जागर,उद्वेग ,चित्त_ अस्थिरता,कृशता,प्रलाप,व्याधी,प्रेमोन्माद,मोह व शेवटी मृत्यु अशा दहा अवस्था निर्माण होतात
हे रूक्मिनीमातेचे ज्ञात प्रेम आहे वेड़ेपण नाही
या भगवंत प्रेमापोटी रूक्मिनी मातेने आठ श्लोकाची पत्रिका सुदेव ब्राह्मणाकरवी भगवान श्रीकृष्णाला पाठवली
त्यात रूक्मिनीमाता म्हणते
*एक दो पांचा साता !जन्म शता वरिन!!*
याला प्रेम म्हणतात
इथे वेधाची पुर्णता आहे
एवढी निष्ठा भगवंताप्रती असल्यावर भगवंत भेटल्याविना रहात नाही
भगवान श्रीकृष्ण येवुन रूक्मिनी मातेला घेऊन गेले
प्रेम आहे तिथे विनोद असतोच
एकदा असेच भगवान श्रीकृष्ण रूक्मिनी मातेला म्हणाले
आपन माझे बरोबर विवाह केला काय पाहिले आपन माझ्यात?
आमचेकड़े मान नाही.

राज्य नाही, कोणी आम्हाला चांगले म्हणत नाही
आम्हाला तर चोरजार शिखामणी असेही म्हणतात
असे असुनही आपन आमच्या साठी सर्वस्वाचा त्याग करून माझ्या सोबत आलात?
भगवान श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून रूक्मिनी माता तर क्षणभर बेशुद्धच झाल्या.
अतिप्रेमाचे जे स्थान असते त्याची निंदा भक्त सहन करू शकत नाही
फक्त तो भक्त असला पाहिजे भगत नसावा.
तेव्हा रूक्मिनीमाता भगवंताला म्हणतात
तुम्ही मला वेड़ी समजता की काय?
मी देवी आहे,जैवी नाही.
*दैवी होषा गुणमयी*
जीवाची नाही मम म्हणजे देवाची आहे देवाचिच राहणार.
जीव तर तुच्छ आहेत
ते तर जीवंत असुनही प्रेतवत् आहेत
प्रभू!
आपणामुळे हे सर्व जिवंत आहेत.
मी जीवाला कधिही वरणार नाही
मला एक आपण पुरे आहात.
आपन सच्चिदानंदघन आहात
संत महात्म्ये वेड़ेपण नाहीत प्रभू
सर्व संसाराचा त्याग करून आपल्या चरणाप्रती जन्मच्या जन्म घालवायला.
म्हणूनच
संत महात्म्यांच्या ठिकाणी अनेकांचे ड़ोके शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे
संतापायी माझा विश्वास आहे
म्हणून
प्रभू!
*एक दो पांचा साता!जन्म साता वरिन!!*
धन्य ती रूक्मिनी माता
आणि
खरच भाग्यशाली आहेत आज कार्तिक शुद्ध दशमीला जे पढंरीत असतील
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment