˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

दुसरी कृष्णपक्षी तुज निर्धारेसी दिधली असे

दुसरी कृष्णपक्षी तुज निर्धारेसी दिधली असे
भगवान पढंरीश परमात्माच्या वर्षातील दोन वारी महत्त्वाच्या
आषाढी व कार्तिकी
कार्तिक शुद्ध एकादशीला श्रीगुरू निवृत्तीदादा ,माऊली ज्ञानोबाराय ,सोपानकाका व मुक्ताई हि चारही भावंड़ पढंरपुरात वारीला आली होती
एकादशीला संत सभा भरली
त्या सभेला गोरोबाकाका,सावता महाराज,परीसा भागवत व नामदेव रायांचे कूटुंब तसेच आदिकरून संत मड़ंळी व भगवान पढंरीनाथ स्वतः उपस्थित होते
माऊली ज्ञानोबारायांचे वय होते त्यावेळी बावीस वर्षे
या संत सभेत माऊली ज्ञानोबाराय आपल्या मनातील इच्छा आपले श्रीगुरू निवृत्तीदादांची अमर्यादा होऊ नये म्हणून थेट भगवान पढंरीश परमात्माकड़े आपल मत माड़ंतात
गुरूसाठी रड़त बसल्यापेक्षा आपल्या गुरूंच्या हातानी समाधी घ्यावी
ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी !समाधान तूची होसी!परी समाधी हे तुजपाशी!घेईन देवा!!
माऊली ज्ञानोबाराय भगवंताला म्हणतात
देवा
मला मुक्ती नको तर तुझ्या चरणाशी समाधी हवी आहे
तेव्हा भगवंत म्हणतात
ऐके गा ज्ञान चक्रवर्ती!तु तव ज्ञानाचीच मुर्ती!परी पुससी जे आर्ती!ते कळली मज!!
भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबारायांचे सर्वांगं न्याहाळत आपल्या हाताने माऊली ज्ञानोबारायांचे मुखावरून हात फिरवतात
व म्हणतात
म्हणे तुवा घेतली जे आळी!ते सिद्धीते पावेल!!
असे म्हणून भगवान परमात्माने माऊली ज्ञानोबारायांची समाधीचे स्थान व तिथी सांगितली

त्रयोदशी म्हणे पाड़ुरंग!काही न करी गा उद्वेग! अंलकापुरी समाधी प्रसंग!करी करी लवलाही!!
अंलकापुरात कार्तिक मासातील कृष्ण पक्षात त्रयोदशीला समाधीची वेळ भगवान पढंरीश परमात्माने कार्तिक शुद्ध एकादशीला संत सभेत जाहीर करताच सर्व संत मांदियाळीनी परमात्माच्या नावाचा जयघोष केला
पुड़ंलीक वरदा हरि विठ्ठल
पढंरीनाथ भगवान की जय
भगवान पढंरीनाथ पुन्हा सर्व संत मांदियाळीत म्हणतात
कार्तिक मासी शुद्ध एकादशी!पढंरीयात्रा होईल सरिशी!दुसरी कृष्णपक्षी तुज निर्धारेसी!दिधली असे!!
या मग अंलकापुरीला
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment