˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

जय मुक्ताई

हरिश्चंद्र राजाने स्वप्नात दान दिले
सकाळी उठल्यावर ते सत्यात उतरवले
आणि
आपल्याला तर स्वप्नांत सुद्धा दान केल्याचे आठवत नाही
जय मुक्ताई

साध्य

साध्य
येशु म्हणतात
एक वेळ छोट्याश्या सुईच्या दोरा ओवायच्या छिद्रातुन मोठ्यात मोठा हत्ती जाऊ शकेल
पण
केवळ धनवंत आहेत म्हणून त्याला त्या धनाच्या बळावर भगवत् धामात प्रवेश मिळेल हि आशाच नाही.
मात्र
आध्यात्मिक जिवनशैली,तपश्चर्या,सतत हरिनाम जप,नामसंकिर्तन,आत्मा-परमात्मा परिचय,व प्रामाणिकपणे भगवद् प्राप्तीच्या प्रयत्नातुन हे साध्य साध्य होऊ शकते


कार्तिक पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा
याच दिवशी देवाधिदेव महादेव यांनी त्रिपुरासुराचा वध केला
म्हणुन हा उत्सव दिपोत्सव म्हणुन साजरा केला जातो
हा साक्षात देवांचाच उत्सव
असुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय..
जय मुक्ताई

देव दिवाळी

🌺|| श्री विठ्ठल ||🌺
त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा पेटवितात. या दिपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.
तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.
कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात.
जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.
शुभ दिवाळी
जय जय मुक्ताई👏👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

अमृतत्व

अमृतत्व
महर्षी याज्ञवल्कजींना दोन पत्नी होत्या.
एक कात्यायणी व दुसरी मैत्रेयी
यात कात्यायणी ही सामान्य संसारी स्री होती.
तर मैत्रेयी हि प्रगल्भ विचाराची स्री होती.
याज्ञवल्कजी संन्यास घेण्यासाठी निघाले असता त्यांनी आपले धन दोन्ही पत्नीमध्ये समान वाटण्याचे ठरविले.
कात्यायनी ऐहिक सुखासाठी धन पसंत करून संतुष्ट झाली.
परंतु
मैत्रेयीने याज्ञवल्कजींना विचारले
हे भगवन्!
पृथ्वीवरील सारे धन मला मिळाले तर मी अमृतयुक्त अशी सुखी होईल का?
तेंव्हा याज्ञवल्कजी म्हणाले
धनाने अमृतत्व प्राप्त होईल अशी आशा नाही
संसारातील दुःखातुन मुक्त व्हावयचे म्हणजे अमृतत्व म्हणजेच मोक्षप्राप्ती झाली पाहिजे
ते खरे सुख.
तेंव्हा मैत्रेयी म्हणाली
मग अशा धनाचे मी काय करू?मला ज्यामुळे अमृतत्व मिळेल ते ज्ञान द्यावे
हे ऐकून ऋषीवर आनंदी झाले
अमृतत्व म्हणजे आध्यात्मिक सुख.
परमानंद,परमशांती,मोक्षप्राप्ती होय.
बाह्यसुखापेक्षा इद्रियंगम्य अंतःसुखाची व आध्यात्मिक सुखाची योग्यता कधिही श्रेष्ठच.
म्हणून
अमृतत्वस्य तु न आशा अस्ति वित्तेन!!


दर्शन

दर्शन
   जगद्गुरू तुकोबाराय यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे.जगद्गुरू तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचे दर्शन घ्यायला आळंदी क्षेत्री आले होते.समाधीजवळच पक्षी दाणे टिपत होते.तुकोबारायांनी समाधीला साष्टांग नमस्कार घातला,तसे सगळे पक्षी भुर्रकन उडून गेले.तेव्हा त्यांना कळून आले की मला देवाचे चतुर्भुज दर्शन झाले म्हणजे मला देवाने फसवले.कारण जर मला सर्वत्र हरि-दर्शन झाले आहे सर्वाभूती प्रेम आहे तर या पक्ष्यांना माझी भीति का वाटावी ? त्यांना पक्ष्यांना माझी भीती वाटाली त्याअर्थी देवाने मला ठकविले हे नक्की.नंतर जगद्गुरू तुकोबारायांनी त्याच ठिकाणी नामस्मरण करीत ताठ उभे राहून अनुष्ठान मांडले.अंतःकरणात प्रेम आणि करूणा भरलेल्या स्थितीत जवळपास तीन दिवस उभे राहिल्यानंतर मग,उडून झाडावर जाऊन बसलेले पक्षी त्यांच्या खांद्यावर येऊन बसले तेव्हा,तुकोबारायांचे समाधान झाले.
प्रसंग संपला सिद्धांत पाहूया,जगद्गुरू तुकोबारायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेला आपल्या अखंड नामस्मरणाच्या अनुष्ठानाच्या तपाची test चाचणी लावली.शंख-चक्र-पद्मधारी रूपातील भगवंतांचे दर्शन होणे हे खरे दर्शन नाही.भगवान् पांडुरंग परमात्म्याच्या कृपेची कसोटी म्हणजे,तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचे तर, *माझी कोणी न धरू शंका।ऐसें हो कां निर्द्वद्व।तुका म्हणे जें जें भेटें।तें तें वाटे मी ऐसें।* जेव्हा मला जें जें भेटेल तें तें माझेच रूप आहे असे वाटेल तेव्हा मला स्पष्ट दर्शन झाले आणि पांडुरंगाची कृपा झाली असे मी समजेन,असे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात.यालाच आत्मदर्शन ही संज्ञा आपण देऊ शकतो.

या तर मग समाधी सोहळ्याला....म्हणजे आळंदीला....
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/

उरले ते हरि तुम्हां समर्पण

उरले ते हरि तुम्हां समर्पण
गीता मनुष्याला सांगते
शनैः शनैः उपरमेत्
आता धिरे धिरे उपराम होणे आवश्यक आहे
काल सारखा पुढे जातोय
तो तर कुणासाठीच थांबत नाही
आपल्या जीवनातील बरेच दिवस गेले
आता थोडेच तर उरलेय
गेलेल्या जीवनात अनेक विषयांचा स्पर्श झाला
अनुभव काय आला?
कोणताही आनंद विषयात मिळाला नाही
मनाला जरा समजावा
आता बस की?
हजारो प्रकारच्या स्वरांचा भोग कानाने घेतला
हजारो मन अन्नाची विष्टा केली
अनंत सुवास घेतले
शिल्लक काय उरले?
वेगवेगळ्या नरम गरम गाद्यावर झोपून स्पर्श विषय अनुभवला
यातला कोणता भोग जीवनात स्थिर राहीला?
अस मनाला थोडे थोडे समजवायला हवे आता
कारन

क्षणभंगुर नाही भरवसा
थोडेसे पुर्वपुण्य आहे म्हणून येथवर आलात
आता
व्हारे सावध तोड़ा माया आशा
उद्या त्रिपुरारी पौर्णिमा झाली की हे संताचे जीवाला सावधान करणारे शब्दही कुठे ऐकायला मिळेलच हे सांगता येत नाही
परमात्मा उदार आहे
तो आपल्याला नक्कीच क्षमा करील
माऊली तर म्हणतात
झड़झड़ोणी वहिला निघ!भक्तीचिये वाटे लाग!तरीच पावसी अव्यंग!निजधाम माझे!!
झाले गेले त्याचा विचार सुद्धा करू नका
फक्त म्हणा
उरले ते हरि तुम्हां समर्पण
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

मन

मन
जेव्हा आपन म्हणतो आपल्याला आपल मन कळलय तेव्हा ते खऱ्या अर्थान समजलेलं नसत
तरीही आपन त्याला भुलतो
संत,शास्त्र,नीती सर्वच सांगुन दमले तरी मनामागे जाणारा माणूस अजुन थांबलेला नाही
मन आपल्यामागेय का आपन मनाच्या मागे आहोत कि आपनच मन आहोत
यात सामान्य माणुस लक्षच घालत नाही
जागेपणी धावणं तर चालूच असत
पण स्वप्नातही धावणं बंद नसत
स्वप्नात सर्वकाही आपनच असतो
बाहेरच्यांना तिथ प्रवेशच नाही
स्वप्नात आपनच आपल्याला सुख-दु:ख देत असतो
हेच आपल रोजचचं जीवनय
यात काही बदल होत नाही
असं काऽ
मनाला शत्रु मानाव की मित्र हे अनिर्णित आहे
वाईट माणूस हा शरीराने वाईट नसतो किंवा चांगला माणुस हा स्वर्गातुन शरीर घेवुन आलेला नसतो
त्याचं मन कसयं यावर ते मुल्यांकन ठरत असत..
सर्वशास्त्रसंपन्न सोन्याचं घर असणारा रावण व कंदमुळे खाऊन जीवन व्यतीत करणारे ऋषिमुनि यात आदरणीय कोनाला मानणारऽ
आजही तसचयं सर्वसाधनसंपत्ती असलेले लोक तर एकीकडे लेखक,विचारवंत
यात मान कोणालाय हे काही वेगळ सांगायला नकोय
याच मुळ कारण मनच
पहिल्यांदा मनात संकल्प येतो मग इंद्रियातुन क्रिया होते
मन जागेवर नसेल तर योग्य प्रतिक्रिया उमटत नाही
परमात्म्याच्या सृष्टीबरोबर मन ही आपली सृष्टी निर्माण करते
या सृष्टीचे आयुष्य अल्प असले तरी निर्मिती चालुच असते
माऊली म्हणतात..
संकल्पे सृष्टी घडी।सवेचि विकल्पुनि मोडी।
मनोरथांच्या उतरंडी।उतरी रची॥
मन कस आहे व केवढय हे पाहता नाही येत उलट याला फिरण्यास त्रैलोक्यही कमी पडत
मन बुद्धीचा द्वेष करते व निश्चयालाही उधळुन लावते..
मनाबद्दल कितीही विचार केला तर मन हे शेवटी मनच आहे
मनामुळ आलेल्या संकटांना तोंड
देत पुढे सरकत असतो
मन प्रसन्न राहणे महत्वाचे आहे
कारण मानसिक ताण अनेक रोगांना जन्म देत असतो
चुचकारून का होईना मनाला चांगल शिकवणं हे आपल्या हातात आहे
मन चांगल असेल..
तरच परमार्थही साध्य होन्यास वेळ लागनार नाही
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

jai muktai

आपल्या गरजा विशिष्ट मर्यादित ठेवणारा मनुष्य जीवनाचं समाधान मिळवू शकतो.सत्ता आणि संपत्ती सुख प्रदान करू शकत असती तर जगातले सारे श्रीमंत आणि सत्तासम्राट आज आनंदाच्या वलयात गुरफटून गेले असते.बाह्य साधनसंपत्ती माणसाला इंद्रियांचा दास बनवते हे आजच्या अनेक उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे.मनाची निर्मलता आणि आचारविचारातली शुद्धता हाच शाश्वत सुखाचा मार्ग आहे.म्हणून तर संतांनी दाखवलेला आणि निवडलेला मार्ग धरावा. *जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।* संतांच्या अनुकरणाकडे आणि आचरणाकडे पहावं,आम्ही संतांना आदरणीय समजतो अनुकरणीय समजलं गेल पाहिजे.ज्यादिवशी आम्ही अनुकरणीय समजून जगायला सुरवात करू तेव्हा आपल्या गरजा नियमित करून गरजेइतकीच संपत्ती मिळवावी आणि *उदास विचारे वेच करी* हा संताचा मार्ग खऱ्या अर्थाने जगलो. भगवान बुद्धांची यासंबधांने एक कथा आहे.एकदा भ.बुद्धांना एका शिष्यांन विचारलं,'भदन्त,रात्री कडाक्याची थंडी असते.आपण वाळलेल्या पानांवर झोपता.आपणाकडे तर उबदार कपडेही नाहीत.अशा स्थितीत आपल्याला झोप येते कां ? भ.बुद्ध हसले ते म्हणाले, *"गाढ झोप येण्यासाठी शय्येची आणि उबदार वस्त्रांची जरूर नसते.मनाची निर्विकारता असली पाहिजे निर्वेध झोप लागते."* त्यांच्या या उत्तरात जीवनाच्या आनंदाच रहस्य सामावलं आहे.संतांच्या जीवनात भौतिक सुखसाधनांची त्यांना जरूर नसते.निरहंकार,निरिच्छता आणि सर्वाभूती स्नेहभाव हीच त्यांची अखंड संपत्ती असते.

अनर्थकारी

अनर्थकारी
अर्थमनर्थ भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यम्!
पुत्रादपि धनभाजां भीतीः सर्वत्रैषा विहिता रीतिः!!
द्वादश पंजरिका नावाच्या ग्रंथात जगदगुरू शकंराचार्य म्हणतात
पैसा अनर्थकारी आहे
हे मनुष्याने नेहमी मनात बाळगाव.
पैस्यापासुन काड़िमात्रही सुख नाही
उलट धनवंताला स्वतःच्या मुलापासून देखील भिती वाटते
म्हणून
तर ते धन ,पैसा आपल्या परिवाराच्या पासून लपवून ठेवतात
कुठे कुठे नाही बहुतांश सर्व ठिकाणी हेच चित्र आहे
रात्रंदिवस पैसा पैसा करणारेना जगदगुरू हा उपदेश करतात
जरूरी पुरता पैसा जीवनात उपयोगी आहे
पण
त्या पैस्याचा जिवनभर सग्रंह करत राहने म्हणजेच भयालाच आमंत्रण देणे आहे
याच्या मनुष्याने फारच आहारी न जाता पैश्याचे वास्तविक मुल्य जाणावे
हिच जगदगुरू शकंराचार्याना अपेक्षा


तुळसी विवाह

तुळसी विवाह
🌹🌹🌹🌹🌹
तुळसीचे पान । एक त्रैलोक्या समान ।। १।।
उठोनियां प्रातःकाळी । वंदी तुळसी माऊली ।।२।।
मनीचें मनोरथ । पुरती हेंचि सत्य ।।३।।
तुलशीचें चरणीं । शरण एका जनार्दनीं ।।४।।
अशाप्रकारे संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.एकंदरीत भारतीय समाजात तुळस या वनस्पतीला मानाचेस्थान आहे. समुद्रमंथनातून जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. प्रत्येकाच्या दारी तुळशीवृंदावन असतेच. नित्य नियमाने तिची पूजा केली जाते सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते देवळात परमेश्वराला तुळशीपत्र वाहिले जाते. पूजाविधी मध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याऐवजी तुळशीचे पान वाहिले जाते. श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय असे मानले जाते. पंढरपूरच्या विठोबाची पूजा करताना त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे असेही मानले जाते. सत्यनारायणाच्या पूजेत एक हजार तुळशीपत्रे वाहिली जातात. कोणालाही दान देताना तुळशीपत्र वाहून ते दिले जाते. देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीचे एक पान नैवेद्यावर ठेवून तुळशीच्या दुसर्या पानाने नैवेद्य दाखवला जातो व नंतर ते पान देवाला वाहिले जाते.हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यु झालातर त्या मृतदेहाच्या तोंडात, देहावर, कपाळपट्टीवर आणि दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवले जाते.भारतीय समाजात तुळशीला एवढे मानाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छवासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते, त्यामुळे हवा शुद्ध रहाते ती कफनाशक व पाचक आहे सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे. तुळशीची पाने, आले व गूळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो. चहा कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले तुळशीची पाने जेवल्यानंतर चावून खाल्यास पचन चांगले होते. तुळशीरस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. रक्तातील, कोलस्ट्रोल कमी होते. कोलायटिस, अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कोड , मेदवृद्धी, डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत स्मरणशक्ती वाढवण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्याचे पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लघवी स्वच्छ होते.वृंदावनी, विश्वपूजिता, पुष्पसारा, कृष्णजीवनी अषा नावांनी ओळखली जाणारी तुळस ही एक झुडुपवजा वनस्पती आहे. ती तीन ते चार फूट इतकी उंच वाढू शकते. त्याला एक विशिष्ट सुगंध असतो. या रोपट्यावर भ्रमर झेपावत नाहीत ,फुलपाखरे भिरभिरत नाहीत आणि पाखरे आपली घरटी बांधत नहीत. पांढरी तुळस आणि कृष्णतुळस असे याचे दोन प्रकार आहेत.त्यापैकी कृष्णतुळस औषधी असते.तुळशीचे औषधी गुण आणि धार्मिक भाव यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे आपण वारकरी आहोत, विठोबाबद्दल आपल्याला आस्था आहे हे दाखवण्यासाठी वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीच्या वाळलेल्यालाकडाचे मणी ओवून ही माळ बनवली जाते. आपल्या आराध्यदेवतेचा नामोच्चार व जप करण्याचे एक साधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो.
*तुलसी विवाह* :-
कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो .काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात.नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते.त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.यासंबंधी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही प्रतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यपुण्यामुळे विष्णूला जालंधराला मारणे अवघड होऊन बसले. तेव्हा श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला.हे सर्व वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला. .व ती स्वत; सती गेली. तिच्या मृत्युच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, तीच तुळस . म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते. अशीही एक कथा सांगण्यात येते.पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्यावेळेपासूनतुलसीविवाहास प्रारंभ झाला असे मानतात.
.तुलसी स्तोत्र :-
तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी |अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम ||सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा |द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: ।।
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

अवमूल्यन

अवमूल्यन
इग्रंजाचे काळातील नोट आताच्या काळात एखाद्याने व्यवहारात दाखवली तर लोक म्हणतील
हि नोट कधीचीच बंद झालीय

आता तिचे अवमूल्यन पण झाले आहे
परंतु
संतांच्या भावनेचे कधीही अवमूल्यन होत नाही
कारन
संतांच्या भावनेला फार मोठे मुल्य असते
ज्याचे कधिच अवमूल्यन होणार नाही असी त्या संत वाङमया मागील सदभावना असते
संताचे शब्द साधे व व्यवहारील वाटत असले तरी त्यात अर्थ खुप महान असतो
तसेच
व्यवहारात काहीवेळा भाषा खुप मोठी वापरली जाते
पण त्यातला अर्थ मात्र शुन्य असतो
संतांची भाषा सोपी व रोजच्या बोलीभाषेतील जरी वाटत असली तरी त्या शब्दांचा अर्थ महान व महत्वाचा असतो
संतांच्या शब्दात जी शक्ती आहे ती त्या शब्दांची नाही तर तो शब्द ज्या पवित्र अशा मुखातून आलाय त्या महात्मांची शक्ती व तपश्चर्या त्या मागे असते
म्हणून तर संतांनी म्हटल आहे ना?
शब्दांचीच रत्ने करून अंलकार !तेणे विश्वंभर पुजीयेला!!

म्हणून
तर सातशेहून वर्षे लोटली तरीही संताची ज्ञानेश्वरी व अभंग नवीन चैतन्य देतात
संतांनी तर
जोड़ीले हे न सरे धन
संत महात्म्ये समाजालाही ज्याच कधिच अवमूल्यन होत नाही असा उपदेश करताना म्हणतात
तुका म्हणे पहा शब्दची हा देव
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

सुंदरता

।।सुंदरता।।
आम्ही हिमालयात जाऊन आलो,मी आणि आमचे सहकुंटुंब पृथ्वीवरील स्वर्ग काश्मीरला जाऊन आलो.आम्ही या हिवाळ्यात abroad ला म्हणजे परदेशात जाणार आहोत.असे संवाद हमखास ऐकायला मिळतात.जो तो आपआपल्या कुवतीप्रमाणे भूतलावरील सौदंर्यस्थळे सुंदर ठिकाणे पाहतात.सुंदरता अर्थातच अवर्णनीय असते.शब्दांत बांधू नाही शकत की डोळ्यात साठवू नाही शकत, ना दुसऱ्याला शब्दांतून व्यक्त करून सांगता येत खूपच सुंदर एवढचं सांगू शकतो.
सुंदरता बऱ्याच प्रकारची सांगू शकतो.
नात्यांची सुंदरता
निसर्गाची सुंदरता
माणसाची सुदंरता
शब्दांची सुंदरता
विचारांची सुदंरता अशा बऱ्याच कल्पना केल्या तरी संतांनी ही सुंदरता दुसरीकडेच पाहिली.
कारण हे सर्व सुंदर आहे.पण त्याच्या सुंदरतेविषयीची संतांची कल्पना त्याहून सुंदर आहे.ह्याचे कारण काय ? आत्म्याच्या सुंदरतेची बरोबरी जड वस्तूची सुंदरता कशी काय करणार ? आत्मा हा सुंदर आहे आणि तो सुंदर असला की अवघे चराचर सुंदर आहे. संतांनी आत्म्याची सुंदरता पाहिली.ती आत्म्याची सुंदरता आम्हीही पाहू शकतो.फक्त त्या दृष्टीची गरज आहे ती ही सर्व सुंदरता पहायला.भगवान् परमात्म्याने ती प्रत्येकाला दिलेली आहे.गरज आहे तीचा शोध घेण्याचा.मी तर शोधायला निघालोय.....
कारण आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही.


देखीला देखीला माये

देखीला देखीला माये
   पोहे म्हणजे सर्वांचा नाष्ट्याच बहु प्रचलित पदार्थ
बहुतेक श्रीमंतापासुन ते गरीबांपर्यत सर्वच पोहे खातात
पण पोह्याची गोष्ट जरी निघाली तरी आठवण होते ति सुदाम्याच्या पोह्यांची
कारण
ज्याला अमृताला अमृतत्व देता येते तो पोहे खातोय सुदाम्याची
म्हणून सुदाम्याच्या पोह्यांना मुल्य आहे
तसेच
बोर हा एक आबंट गोड़ मिश्रीत पदार्थ
लहानापासुन थोरापर्यंत सर्वच खातात
परंतु
बोर म्हटल की आठवते ति शबरी
आपन सर्वच लहानमुलांसह बोर खातो
परंतु आपली बोर खाल्लेले रामायणात येत नाहीत
काल कार्तिक वारी झाली
भगवान पढंरीनाथाचे लाखो वारकरी बांधवानी दर्शन घेतले
सर्वांचेच ड़ोळे भगवान परमात्माला पाहतात
परंतु

संत ज्ञानेश्वर महाराज आदी करून संतांनी भगवंताच जे स्वरूप पाहिले ते
ड़ोळा भरीयले रूप !चित्ती पायाचा सकंल्प!!
ज्यांनी भगवान परमात्माला ड़ोळे भरून पाहिले
त्यांना दुसरे काहीही दिसतच नाही
माऊली तर म्हणतात
देखीला देखीला माये देवांचा देव!फिटला संदेह निमाले दुजेपण!!
अथवा
तो हा रे श्रीहरि पाहिला ड़ोळेभरी!पाहता पाहणे दुरी सारोनीया!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

वाया व्यर्थ कथा न सांड़ी मार्गू

वाया व्यर्थ कथा न सांड़ी मार्गू
अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यःकुशलो नरः!
सर्वतः सारमादयात् पुष्पेभ्यः इवले षटपदः!!
धर्मग्रंथ ,शास्त्र व अठरा पुरानात सर्वच आहे
देवांचीही व असुरांचीही चरित्र आहे
परंतु
भुंगा जसा फुलांमधुन मध गोळा करतो
त्याप्रमाणे हुशार मानसाने लहान व मोठ्या सर्व शास्रांमधून मंथन करून असुरी कथांचा त्याग करून साररूपी मध गोळा करावे
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

दुसरी कृष्णपक्षी तुज निर्धारेसी दिधली असे

दुसरी कृष्णपक्षी तुज निर्धारेसी दिधली असे
भगवान पढंरीश परमात्माच्या वर्षातील दोन वारी महत्त्वाच्या
आषाढी व कार्तिकी
कार्तिक शुद्ध एकादशीला श्रीगुरू निवृत्तीदादा ,माऊली ज्ञानोबाराय ,सोपानकाका व मुक्ताई हि चारही भावंड़ पढंरपुरात वारीला आली होती
एकादशीला संत सभा भरली
त्या सभेला गोरोबाकाका,सावता महाराज,परीसा भागवत व नामदेव रायांचे कूटुंब तसेच आदिकरून संत मड़ंळी व भगवान पढंरीनाथ स्वतः उपस्थित होते
माऊली ज्ञानोबारायांचे वय होते त्यावेळी बावीस वर्षे
या संत सभेत माऊली ज्ञानोबाराय आपल्या मनातील इच्छा आपले श्रीगुरू निवृत्तीदादांची अमर्यादा होऊ नये म्हणून थेट भगवान पढंरीश परमात्माकड़े आपल मत माड़ंतात
गुरूसाठी रड़त बसल्यापेक्षा आपल्या गुरूंच्या हातानी समाधी घ्यावी
ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी !समाधान तूची होसी!परी समाधी हे तुजपाशी!घेईन देवा!!
माऊली ज्ञानोबाराय भगवंताला म्हणतात
देवा
मला मुक्ती नको तर तुझ्या चरणाशी समाधी हवी आहे
तेव्हा भगवंत म्हणतात
ऐके गा ज्ञान चक्रवर्ती!तु तव ज्ञानाचीच मुर्ती!परी पुससी जे आर्ती!ते कळली मज!!
भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबारायांचे सर्वांगं न्याहाळत आपल्या हाताने माऊली ज्ञानोबारायांचे मुखावरून हात फिरवतात
व म्हणतात
म्हणे तुवा घेतली जे आळी!ते सिद्धीते पावेल!!
असे म्हणून भगवान परमात्माने माऊली ज्ञानोबारायांची समाधीचे स्थान व तिथी सांगितली

त्रयोदशी म्हणे पाड़ुरंग!काही न करी गा उद्वेग! अंलकापुरी समाधी प्रसंग!करी करी लवलाही!!
अंलकापुरात कार्तिक मासातील कृष्ण पक्षात त्रयोदशीला समाधीची वेळ भगवान पढंरीश परमात्माने कार्तिक शुद्ध एकादशीला संत सभेत जाहीर करताच सर्व संत मांदियाळीनी परमात्माच्या नावाचा जयघोष केला
पुड़ंलीक वरदा हरि विठ्ठल
पढंरीनाथ भगवान की जय
भगवान पढंरीनाथ पुन्हा सर्व संत मांदियाळीत म्हणतात
कार्तिक मासी शुद्ध एकादशी!पढंरीयात्रा होईल सरिशी!दुसरी कृष्णपक्षी तुज निर्धारेसी!दिधली असे!!
या मग अंलकापुरीला
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

वाचावी_ज्ञानेश्वरी.......

🌺|| श्री विठ्ठल ||🌺
#वाचावी_ज्ञानेश्वरी.......
घरात लहान मुल असल की ते आईला काम करू देत नाही. त्यात दिवाळीचे खुप सारे पदार्थ आपल्या बाळांसाठी आईला बनवायचे असतात. मग आई बाळाला शांतपणे झोपू देते. ऐकदाच की बाळ झोपले मग आई सर्व त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून ठेवते.
आपनही या संसारात आलोय व आपल्यालाही गेली अनेक वर्षे अज्ञानाची झोप लागली आहे. विश्वाची माऊली ज्ञानोबारायानी आपल्या सारख्या अज्ञानाच्या झोपेत असलेल्या अनाथ जीवांकरीता "ज्ञानेश्वरी" नावाच सुदंर असे फराळ बनवून ठेवले आहे.
आता फक्त बाकी आहे त्याचा आस्वाद घ्यायच
चला मग....
अनादी काळापासुन अज्ञानाच्या झोपेतून जागे होत संतश्रेष्ठ श्री माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची #एक_तरी_ओवी_अनुभवूया.........
नित्य दिवाळी
जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

वेधिले वो मन तयाचिये गुणी

वेधिले वो मन तयाचिये गुणी
गुण व लावण्य तसे सर्वातच एक ना एक असतातच
इद्रांजवळ लावण्य आहे पण गुण काय?
अहिल्येच्या मागे धावतो
चंद्र लावण्यवान पण गुण काय तर म्हणे काळा.
कैकयी अती लावण्यवती पण गुण कोनता?
नवरा वैकुंठाला अन राम वनवासाला.
असंही म्हणतात
बहुतेक आजही अनेक दशरथ रूपालाच भाळतात
गुण पहायला वेळ आहे कुणाला?
दश इंद्रियावर हा मानव रथ चालतो तो दशरथ
या शरीरातला आत्माराम वनवासाला गेला तर हा दश इद्रियांचा दशरथ जीवंत राहिल?
कैकयीच्या लावण्याला भुलून दशरथ मेला.
लावण्य व दैवी गुण याचा सुंदर समन्वय म्हणजे भगवान परमात्मा
यांच्याकडे यश ,श्री,औदार्य,ज्ञान,वैराग्य व ऐश्वर्य हे गुण आहे
परमात्मा जगतातील अती सुंदर वस्तू आहे
प्रभू श्री रामाचे अगणित लावण्य पाहिल्यावर अनेक ऋषीमुनीं भुलले
भगवान श्रीकृष्णांची रासलीला बघून भगवान शिवजी ही मोहीत झाले
जन्मताच संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य रंभेचे लावण्य बघून जराही विचलीत झाले नाहीत

पण भगवान श्रीकृष्णाच्या लावण्याला भुलले
जीथे देवाधीदेव महादेव भुलले तिथे संत महात्म्येही भगवंताच्या रूपालाच मोहीत झाले
माऊली ज्ञानोबाराय एक निर्गुण निराकार योगी
जेंव्हा पढंरपुरातील श्रीविठ्ठलाचे अलौकिक असे सावळे स्वरूप पाहिले तेव्हा माऊली म्हणतात
*वेधिले वो मन तयाचिये गुणी!क्षणभरी न विसंबे विठ्ठल रूक्मिनी!!*
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

सुखाचा निधि सुख-सागर जोडला

सुखाचा निधि सुख-सागर जोडला।म्हणोनि काळा दादुला मज पाचारी गे माये।१।
प्रेम नव्हाळी मज जाली दिवाळी।कान्हो वनमाळी आले घरा गे माये।२।
बाप रखुमादेवी-वरू पुरोनि उरला।सबाहेजु भरला माझे हृदयीं गे माये।३।
आनदांचा तो ठेवा,तो आनंद-समुद्र माऊली म्हणतात आजा मला परिपूर्ण वश झालेला,आहे.म्हणून गमंत अशी,आहे की,मी त्याच्याकडे जाण्याऐवजी तोच माझ्याकडे येऊन मला,आवाज देत आहे.माऊली म्हणतात आज खरोखरीच मला दिवाळी आहे.प्रेमाची केवढी नवलाई सांगावी की,संसाराचा रंगच ज्याला कधी लागला नाही आणि संसाराच्या गावाबाहेरच ज्याचा नेहमी राबता तो आज माझ्या घराला आलेला आहे.नुसता आलाच नाही तर त्याने येऊन सारें घर व्यापिलें आहे.आणि तरीहि माऊली म्हणतात शेवटी माझी अशी अवस्था झाली की,माझें हृदयच त्याने अंतर्बाह्य भरून टाकले आहे.
संतांच्या अभंगाची उंची आपण काय वर्णावी माऊलींनी अनुभवलेली अवस्था आपण कधी अनुभवायची? ही संतांची दिवाळी पंढरपूरात आता हजर वारकरी अनुभवत असतील यात शंका नाही.

जय मुक्ताई
संग्रहीत चिंतन
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/

जन्म साता वरिन

जन्म साता वरिन
श्रुत्वागुणान्भुवनश्रुण्वताते निर्विष्यकर्णविवरैः हरतैगतापः !!
अशी गुणवान व अलौकिक गुण असलेली भुवन सुदंरी रूक्मिनीमाता 
हिने भगवान श्रीकृष्ण परमात्माचे सुदेव ब्राह्मणाच्या मुखातुन नुसते गुण ऐकले तरी रूक्मिनीमातेचे त्रिविधताप गेले
भगवान परमात्माचे मुख जरी पाहिले तरी सकल पुरूषार्थाचा लाभ होतो
रूक्मिनीमातेने भगवंताचे गुणानुवाद ऐकले तर श्रीकृष्ण प्रेम द्विगुणीत झाले
रूक्मिनी मातेला भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या दर्शनाचे वेध लागले
भक्तीत जर भगवंताचे खरे वेध लागले चिंता,जागर,उद्वेग ,चित्त_ अस्थिरता,कृशता,प्रलाप,व्याधी,प्रेमोन्माद,मोह व शेवटी मृत्यु अशा दहा अवस्था निर्माण होतात
हे रूक्मिनीमातेचे ज्ञात प्रेम आहे वेड़ेपण नाही
या भगवंत प्रेमापोटी रूक्मिनी मातेने आठ श्लोकाची पत्रिका सुदेव ब्राह्मणाकरवी भगवान श्रीकृष्णाला पाठवली
त्यात रूक्मिनीमाता म्हणते
*एक दो पांचा साता !जन्म शता वरिन!!*
याला प्रेम म्हणतात
इथे वेधाची पुर्णता आहे
एवढी निष्ठा भगवंताप्रती असल्यावर भगवंत भेटल्याविना रहात नाही
भगवान श्रीकृष्ण येवुन रूक्मिनी मातेला घेऊन गेले
प्रेम आहे तिथे विनोद असतोच
एकदा असेच भगवान श्रीकृष्ण रूक्मिनी मातेला म्हणाले
आपन माझे बरोबर विवाह केला काय पाहिले आपन माझ्यात?
आमचेकड़े मान नाही.

राज्य नाही, कोणी आम्हाला चांगले म्हणत नाही
आम्हाला तर चोरजार शिखामणी असेही म्हणतात
असे असुनही आपन आमच्या साठी सर्वस्वाचा त्याग करून माझ्या सोबत आलात?
भगवान श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून रूक्मिनी माता तर क्षणभर बेशुद्धच झाल्या.
अतिप्रेमाचे जे स्थान असते त्याची निंदा भक्त सहन करू शकत नाही
फक्त तो भक्त असला पाहिजे भगत नसावा.
तेव्हा रूक्मिनीमाता भगवंताला म्हणतात
तुम्ही मला वेड़ी समजता की काय?
मी देवी आहे,जैवी नाही.
*दैवी होषा गुणमयी*
जीवाची नाही मम म्हणजे देवाची आहे देवाचिच राहणार.
जीव तर तुच्छ आहेत
ते तर जीवंत असुनही प्रेतवत् आहेत
प्रभू!
आपणामुळे हे सर्व जिवंत आहेत.
मी जीवाला कधिही वरणार नाही
मला एक आपण पुरे आहात.
आपन सच्चिदानंदघन आहात
संत महात्म्ये वेड़ेपण नाहीत प्रभू
सर्व संसाराचा त्याग करून आपल्या चरणाप्रती जन्मच्या जन्म घालवायला.
म्हणूनच
संत महात्म्यांच्या ठिकाणी अनेकांचे ड़ोके शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे
संतापायी माझा विश्वास आहे
म्हणून
प्रभू!
*एक दो पांचा साता!जन्म साता वरिन!!*
धन्य ती रूक्मिनी माता
आणि
खरच भाग्यशाली आहेत आज कार्तिक शुद्ध दशमीला जे पढंरीत असतील
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/