हरि मुखें म्हणा......
माऊली ज्ञानोबारायांनी अनाथ संसारी जीवासाठी हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण करून साधे व सुलभ "हरि मुखें म्हणा" असा हितोपदेश केला.
संसारी म्हणजे बायका मुले ज्याला आहेत तो संसारी इतकी संकुचित व्याख्या नसावी संतांच्या मते संसारीकाची जीवदशेला प्राप्त होऊन जगताला सत्य मानणारे व ज्ञानेद्रिंयाद्वारे जगताशी संबंध जोड़णारे सर्व संसारीच आहेत. असा जगताशी सबंध जोड़णारे ब्रम्हंचारी व वानप्रस्थीही संसारी लोकांच्या यादीतच येतात. संसारी म्हणजे गृहस्थाश्रमी इतका संकुचित अर्थ नसेल, संसारी शब्दाचा संसारात जन्माला आलेले सर्व जीव व मानवेत्तर पशु- पक्षी वनश्री- वृक्ष- लता सुद्धा संसारी मध्येच बसतात.
गजेंद्राने व्याकुळ होऊन भगवंतास आर्त हाक मारली तर भगवान अतिवेगाने आले व त्याला सकंटमुक्त केले. गजेद्रं मानव न्हवता पन संसारी नक्कीच होता. अशा सर्वच संसारातील जीवांना संतमहात्मे उपदेश करतात.
"हरि मुखें म्हणा"
संसारातील एखादा मुलगा लहान वयात जर अचानक परमार्थ करायला लागला वा श्रीमद् भगवद्गीता वाचायला जरी लागला तर त्या मुलाचे घरचे म्हणतात, "कारे....गीता वाचुन तुला संन्याशी व्हायचे आहे का?"
बोलणारे विचार करतच नाही, गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण ही संन्यासी नव्हता व गीता ऐकणारा अर्जुन तरी कुठ संन्याशी होता. आणी भगवदगीता श्रवण करून अर्जुनाने संन्यास घेतल्याचे ऐकीवात नाही. वस्त्र संन्यास म्हणजे पुर्ण संन्यास नव्हे, केवळ अग्नीला न शिवणारा वा क्रिया न करणारा हा संन्यासी भगवंताला तरी कुठे मान्य आहे. उलट कर्मफलाचा त्याग करत अनश्रित होत कर्तव्यकर्म करणारा हा पुर्ण संन्यासी
अशी भगवान परमात्माची संन्यास्याची व्याख्या व इच्छा आहे.
केवळ बाह्य पदार्थाचा त्याग दाखवत अंतकरणाने संसाराशीच मोह तो कसा संन्यासी ठरेल. मोह हा तर बंधनकारक आहे, म्हणून संत महात्म्ये दोनवेळा दुरूक्ती करून जीवाला हितोपदेश करतात,
हरि मुखें म्हणा...
हरि मुखें म्हणा...
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment