वैराग्य यासी म्हणो आम्ही....
महाभारतातील एक प्रसंग आहे. आपल्या स्वबळाने अर्जुन सशरीर स्वर्गात इद्रंसभेत गेला तेंव्हा अर्जुनाचे स्वागतासाठी उर्वशी,रंभा आदी स्वर्गलोकीच्या अप्सरानी नृत्य केले. अर्जुनाच्या रूप व व सौंदर्यावर मोहीत होऊन उर्वशीने अर्जुनाकड़े कामावासनेची इच्छा प्रकट करत निवेदन केले. यात काहीही गैर नाही, दोष लागत नाही असे अनेक नाना प्रकारचे तर्कही सागितंले, परंतु आपल्या दृढ इंदियसयंमाचा परिचय देत अर्जुनाचे उर्वशीप्रती उद्गार आहेत.
गुच्छ मुर्घ्ना प्रपंनोऽस्मि पादौ ते वरवर्णिनी |
त्वं हि मे मातृवत् पूज्या रक्ष्योऽहं पुत्वत् त्वया ||
माझ्या दृष्टीमध्ये कुंती,माद्री व शचि यांना जे स्थान आहे तेच तुझे देखील आहे. तू माझ्यासाठी मातेसमान पूज्य आहेस, मी तुझ्या चरणावर प्रणाम करतो. तू तुझा दुराग्रह सोडून परत जा.
अर्जुनाने इतके समाजावूनही उर्वशी अनेक आमिष दाखवू लागली. परंतु अर्जुनाच्या दृढ संयमी वृतीत तिळभरही बदल झाला नाही. शेवटी उर्वशीने संतप्त होऊन अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप दिला.
अर्जुनाने हसत हसत आनंदाने तो ही शाप स्विकारला. परंतु संयम सोड़ला नाही. जो मनुष्य आपल्या आदर्शापासुन हटत नाही, धैर्य व सहनशीलतेला आपल्या चारित्र्याचे भुषण बनवितो, त्याला शाप देखिल काही करू शकत नाही. उलट शाप देखिल वरदान ठरतो.
पुढे बारा वर्षे वनवास व ऐक वर्ष अज्ञात वासात हा शापच वरदान ठरला. हि वार्ता स्वर्गाचा राजा इद्रांला समजली तेंव्हा इद्रांचे उद्गार आहेत. "अर्जुना तू तर तुझ्या इंद्रियसयंमाद्वारे ऋषिमुनीनांही पराभूत केलेस तुझ्या सारख्या पुत्राला जन्म देणारी कुंती या जगातील सर्वश्रेष्ठ माता ठरली आहे".
आपले पैठण निवासी शातीब्रम्हं एकनाथ महाराज अर्जुनाचे वैराग्याचे गुणगौरव करतात.
धनधान्यादी सकळ राशी |
घेऊनी पातली स्वये उर्वशी |
थुंकूनीया न पाहे तिसी |
वैराग्य यासी म्हणो आंम्ही ||
किती छान वाटत फक्त वाचायला व फक्त ऐकायला......
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment