श्रीविठ्ठल या एका शब्दांने महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबरच लोकजीवनावर गेल्या शेकडो वर्षांपासून टाकलेली मोहिनी आज २१ व्या शतकातही कायम आहे. नव्हे रोज नित्यानित्य वाढतच आहे.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून, शहरातून निघालेल्या दिंड्या पंढरीच्या वाटेवर चालत असतात पंढरपुरात विटेवर उभा असलेला हा समचरणी देव ‘विठ्ठल’ केंव्हा एकदा माझ्या भक्तांना बघतो असे त्यास होऊन गेले आहे. तर भक्तही त्याच्या दर्शनासाठी व्याकूळ झाला आहे.
पंढरीची वारी हा वैष्णवांसाठी एक ‘आनंदसोहळा’. ज्या वाटेवरून वैष्णव जात आहेत ती संतांनी सिद्ध केलेली वाट असल्याने ती आनंदरूपच आहे. विठ्ठलभक्तांंच्या पायांना त्रास जाणवू नये म्हणून या वाटेवरील दगडगोटे या काळात मऊ लोण्याचे गोळे झालेले असतात.
कर्म आणि ज्ञान या दोन्ही मार्गांना ओलांडून उपासनेचा मार्ग प्रचलित झाला. या मार्गाला ‘भागवतधर्म’ असे नाव पडले.
महाराष्ट्रातील संतांचा मार्ग हे भागवतधर्माचे विशुद्धरूप आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करणार्या लोकांचा हा धर्मसंप्रदाय आहे.
वारी करताना समूहाने चालत, नाचत, गात, खेळ खेळत जायची परंपरा आहे.
वारी हीच विठ्ठल दैवताच्या उपासनेची पद्धत आहे.
पंढरीला जायचे ते विठ्ठलाच्या भेटीसाठीच.
विठ्ठलाला भेटायचे म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नव्हे.
प्रत्येकजण एक दुसर्याला मानाने वागवितो.
‘माउली’ म्हणून हाक मारतो, पाया पडतो.
क्रोध अभिमान केला पावटणी|
एक एका लागती पायी ||
येथे आपला अहंकार सोडून परस्परांविषयी प्रेमाची व आदराची भावना बाळगली जाते.
दिवसभर पायी पायी चालायचे, थकून उघड्या माळरानावर रात्रीचा मुक्काम करायचा, स्वयंपाक, भोजन, झोप व प्रात:स्नान करून परत पुढची वाटचाल सुरू करायची. आणि हे सलग ४०/४५ व १८/२० दिवस. ऊनपावसाची तमा न बाळगता हा एवढा उत्साह कशासाठी? तो आहे विठ्ठलाच्या भेटीसाठी.
विठ्ठल नवसाला पावणारा देव नव्हे.
त्याला नवस बोलले जात नाहीत
फक्त
आठविन पाय हा माझा नवस
त्याचे दर्शन घेतल्याने एक आध्यात्मिक अनुभूती मिळते. अशी अनुभूती की त्यात विश्व सहभागी होते. त्याचे दर्शन घेतल्याने त्याचा भक्त आनंदाने चिंब होतो. भक्ताला पाहून विठ्ठलही आनंदून जातो. राऊळातून बाहेर येत तो आपल्या लाडक्या भक्तांत मिसळून जातो. त्याची उराउरी भेट घेतो. त्यांच्याशी एकरूप होतो. या सावळ्या गोजिर्या परब्रह्माला बघितल्यानंतर वारकर्यांचा शिणवटा गळून पडतो आणि त्याच्या समचरणी एकरूप झाल्याचा आनंद तो घेतो. पुढील वर्षीच्या आषाढीवारीला येण्यासाठी लागणारी ऊर्जा तो विठ्ठलाच्या मिठीतून अनुभवतो.
वैष्णवांना लागते ती पुढिल वारीची
पढंरपुरला श्रीविठ्ठल दर्शनासाठी महाराष्ट्रातनु अनेक संताच्या पायी पालख्या दर्शनासाठी येतात
त्यात सर्वात पहिले निघते ती आदिशक्ती मुक्ताईची पालखी
व तद्नंतर श्रीगुरू निवृतीनाथ पालखी सोहळा
हे दोन्हीही सोहळे पढंरीला पोहोचण्यासाठी व पुन्हा परतीच्या वारीला बहुदा इतर पालखी सोहळ्याचे तुलनेत भाविकांचे जास्त दिवस मोड़तात
म्हणून आदिशक्ती मुक्ताई व श्रीगुरू निवृतीनाथ दादांनी अशा दोन साधकांकरवी या दोन्हीही पालखी सोहळ्याचे दिवस कमी करून पालखी साठी राजमार्ग असावा असी सकंल्पना भक्तांकरवी पुढे आली
संवादात्मक चर्चाही सुरू झाली
गतानुगतीक न्यायाला अनुसरून परपंरेचे अवड़ंबर यातुन पुढे आले
परंपरा हि भक्तांच्या हिताची असावी
एक मात्र मज आम्हां पामरांना विस्वास आहे
ज्याअर्थी श्रीगुरू निवृतीनाथ व आईसाहेब मुक्ताईनी साधंकाकरवी हि गोष्ट सकंल्पनेत आणली
ती भगवान पढंरीनाथांच्या कृपेने लवकरच पुर्णत्वाला जाईल हा दृढ विस्वास आहे
ज्यादिवशी भक्तांना अपेक्षित असा दोन्हीही पालखी सोहळ्यात मार्ग बदल होत राजमार्ग होईल
तुका म्हणे आले समर्थाचे मना |
जरी होय राणा रंक त्याचा ||
तो दिवस भक्त परिवारासाठी आनंदाचे असेल
आईसाहेब व श्रीगुरू निवृतीनाथ महाराज यांचे एक निष्ठावान भक्त व साधक
ह भ प सागरजी दौड़ं
व
ह भ प प्रफुलमाऊली यांचा आज जन्म दिवस
आम्ही अज्ञानी पामर आपल्या सारख्या निष्ठावान साधकांना काय शुभेच्छा देणार....
भगवान पढंरीश परमात्माकड़े आजच्या मगंल हरिदीनी ऐकच मागणी करूया
हे पाड़ुरंगा
या आपल्या असंख्य भक्तांच्या या सार्थ मागणीला लवकरच यश दे..
जय मुक्ताई
ऋणनिर्देश
चैतन्याचा जिव्हाळा परिवार
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
No comments:
Post a Comment