˙˙जय मुक्ताई ..

Friday, 30 September 2016

नाही तरी संसारू जाईल रया

नाही तरी संसारू जाईल रया

     आत्ताच्या कलीच्या महान ताकदीच्या तावडीतून जीव सहजासहजी सुटेल अस वाटतच नाही. एखाद्याला इच्छा असली तरी स्वतःचे ताकदीवर तरी ते शक्य नाही. अध्यात्मिक ग्रंथ श्रवणाने वा संस्काराने मनुष्याचे मनाला कितीही समजावल व तत्वज्ञान शिकुन लोकांना कितीही उपदेश केला तरी तो  मनुष्य स्वतः मात्र मायेतुन बाहेर पड़लेला दिसत नाही. हि वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही. हा मायेचा प्रताप असतो.
     कलियुगात साधकाला अशी एखाद्या शक्तीची गरज आहे जी या कलीयुगातही उपयुक्त ठरेल
ती शक्ती म्हणजे "भगवंताची नामशक्ती व सदगुरूची कृपा" दळणाच्या जात्याला खालची व वरची अशा दोन तळ्या असतात. या दोन्ही तळ्या इतक्या वजनदार असतात की धान्याचा दाना त्या तळ्यांमध्ये गेला कि त्याचे पिठ होते. तसे परा प्रकृती आणि अपरा प्रकृती ह्या मायेच्या दोन तळ्या आहेत. या दोन्हीत कोणताही जीव एकदा सापड़ला कि तो भरड़लाच जातो. मात्र यातुनही वाचतो तो हे जाते ज्या खुट्यांवर असते. त्या खुंट्यापाशी एक छोटासा खड़्ड़ा असतो. हा खुटं म्हणजे सदगुरू व छोटासा खड़्ड़ा म्हणजे भगवननामाचा खड़्ड़ा. सदगुरूरूपी खुटांजवळ व हरिनामरूपी खड़्ड़ात जो जीव रूपी दाणा पड़ून असतो, त्याचे या दोन्ही तळ्या पिठ करू शकत नाही. हे जाते कितीही वेळा फिरत राहीले तरी हे थोडेसे दाणे सुरक्षितच राहतात.
    संताचे ,सदगुरूचे ह्रदय नवनितासमान असते अनादी संसार मालेत भरड़णारे जीवाची संत कबिरजीना दया येते,
"चलती चाकी देख के दिया कबीरा रोय,
दोउ पाटन के बीच में साबुत बचा न कोय."
     संत महात्म्ये जिवाला उपदेश करतात
मायेच्या जात्यात भरड़ण्यापेक्षा
"ये साते आलिया ओळंगा सारंगधरू"

जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment