˙˙जय मुक्ताई ..

Friday, 30 September 2016

सर्व पुर्ण करी मनोरथ

सर्व पुर्ण करी मनोरथ

     ईश्वर प्राप्ती या जन्मीच व्हावी हि तर प्रत्येकाचीच इच्छा असतेच परंतू, त्यासाठी परिपूर्ण अशा ज्ञानाची गरज असते. भगवान गीतेत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात,
"श्रद्धावानं लभ्यते ज्ञान"
   श्रद्धेमध्ये अदभुत असे सामर्थ्य असते, फक्त त्यासाठी त्या साधकाने स्वतःला पुर्णपणे त्यासाठी वाहून घेतले पाहीजे. अगदी अंतकरणाच्या तळमळीने व आत्मीयतेने त्याने हे कार्य केले पाहीजे. आपल्यापैकी अनेकांची इच्छा तर असते मात्र एखादे कार्य करण्याची इच्छाशक्ती मनात नसते, ईश्वर तर भेटावा हि इच्छा असते पण त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट सोसायला लागू नये अथवा काहीही त्याग करण्याची वेळ येऊ नये
ईश्वराप्रती व ईश्वरीकार्याप्रती श्रद्धा दृढ असावी लागते. श्रद्धेमुळे असंभाव्य देखिल संभ्याव्य होते
श्रद्धेमुळे रेताड़ वाळवंटातुनदेखील नौका सरसर मार्ग कापित पुढे जाते. आचार्य विनोबा भावे यांनी वर्ध्याच्या तुरुंगात असताना दिलेली गीतेवरील प्रवचने तेव्हा तिथेच शिक्षा भोगत असलेल्या साने गुरुजींनी शब्दश: लिहून घेतली. महर्षी व्यासकृत महाभारताचे सार अशी गीता भारतीयांना कायमच दिशा दाखवत आलेली आहे. तिचा संदेश विनोबाजी सोप्या, सामान्यांना समजेल अशा भाषेत पोहोचवितात. हेच आचार्य विनोबाभावेंची सानेगुरुजीलिखीत गीताप्रवचने सोशील मिड़ीयाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा शुभ सकंल्प मागील वर्षी गांधीजयंती दिनी "ह भ प दत्तात्रय शिंदे(अण्णा)" यांच्याकरवी केला गेला. सकंल्प आण्णांनी केला व तो पुर्ण करण्याचा भार भगवान श्रीकृष्ण व विनोबांजीवर टाकत आज पुर्णत्वाला गेला. कुठलिही बाब नित्यनेमाने करणे हे अगदी संसारी मनुष्याला तरी अशक्य असते. परंतु, शिंदे अण्णांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्माने सकंल्प पुर्णत्वाला नेला. आम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात अनुभवले आहे. किती प्रतिकूल परस्थितीतही आपला गीता प्रवचन पोस्टचा नेम टळला नाही. म्हणतात ना सकंल्प तेव्हा पुर्णत्वाला जातो, तो सत्य सकंल्प असावा लागतो. तेंव्हा कुठे,
"सत्य सकंल्पाचा दाता नारायण |
सर्व पुर्ण करी मनोरथ ||"
    गेल्या वर्षभरात आचार्य विनोबाभावे गीता प्रवचने सोशील मिड़ीयाच्या माध्यमातून वाचक वाढत गेले व लाखोच्या संख्येत जनसामान्यापर्यंत पोहचली. या अत्यंत दुर्मिळ व अविट अशा संत साहित्याचा एक सुदंर असा ब्लॉग असावा हि अपेक्षा शिंदे अण्णा उद्या महात्मा गांधीजी जयंती दिनी आपल्याकड़ून नाविन्यपूर्ण नविन क्रमशः लेखणीची आस ठेवत शब्द प्रपंचाला विराम देतो..
जय हो
जय मुक्ताई🚩
ऋणनिर्देश
चैतन्याचा जिव्हाळा परिवार
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

झाले रामराज्य काय उणे आम्हांसी

झाले रामराज्य काय उणे आम्हांसी

    राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला
आणि दुसर्‍यांना आनंदात रममाण करणारा राम
श्रीरामचंद्र प्रभू दुष्ट रावणादिकांचा वध करून व लंका जिंकून घेतली. आणी विजयश्री श्रीरामचंद्र प्रभु जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले. तेव्हा सर्व अयोध्यावासी जन आनंदी झाले. श्रीराम प्रभु अयोध्येत आले तेंव्हा अयोध्यावासी भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही सर्व ऋषी मुनीं साधुसंत आनंदी झाले. रामराज्य सुरू झाले होते
ऋषीची दानवांमुळे बंद पड़लेले यज्ञ व साधना पुन्हा पुर्ववत सुरु झाली .
     "पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे", हे खरे रामराज्य होय असे संतांनी केलेली रामराज्याची अनुभूती सर्वांना येऊ लागली.
    भगवान श्रीरामचंद्र प्रभु अशाच आनंदात एक दिवस सुर्यास्ताचे वेळी कौसल्या व आदिमातांसह आपल्या राजमहालात बसले होते. तेव्हा प्रभू म्हणतात. कौसल्यामाई आता मी अयोध्येचा राजा झालो आहे. माझ कर्तव्य आहे की माझ्यापेक्षा लहानांना काहीतरी द्यावे. प्रभूनी सर्वांना काहीतरी मागाव म्हणून पहिला नबंर आला तो भरतजींचा
भरतजी प्रभूच्या समोर येताच ड़ोळे आनंदाश्रूने ड़बड़बले व म्हणतात,
"प्रभू,आपके चरणों मे प्रेम बढता रहे"
   भगवान "तथास्तु " म्हणाले.
आता भरतजीचींं पत्नी माड़ंवी प्रभूला नमस्कार करून मागणी करते,
"प्रभू, रघुकूल मे पुत्रवधू बनने का सौभाग्य मिला अब कोई मागंने की इच्छा नही"
भगवान "तथास्तु" म्हणाले.
   आता लक्ष्मणजी भगवंताचे चरणस्पर्श करून मागणी करतात.
"प्रभू, बचपन से साथ रहते आये है इसीतरह अंतिम सांसतक साथ रहना"
भगवान "तथास्तु " म्हणाले.
लक्ष्मणजींची धर्मपत्नी उर्मीलाजी प्रभूला विनम्र भावाने वंदन करत मागणी करते,
"प्रभू, कैसी भी बिकट परस्थितीयां आये पर मेरा धिरज टिका रहे"
भगवान "तथास्तु" म्हणाले.
  आता शत्रूघ्नजी श्रीरामचंद्र प्रभुसमोर मागणी करतात,
"प्रभू, मुझे आपके चरणोंके परमभक्त भरतजींकी चरणोंकी निशीदिन सेवा देना"
भगवान "तथास्तु "म्हणतात.
   आता रघुकूलातील शेवटचे पात्र भगवान श्रीरामचंद्र प्रभु समोर मागणी करत होते,
सर्व उपस्थितांना कुतूहल वाटत होते,
श्रीरामांना प्रणिपात करत शत्रूघ्नजींची धर्मपत्नी श्रूतकिर्ति मागणी करतेय,
"प्रभू, जो मागूं वो दोगे ना आप?"
तेंव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात,
"रघुकूल रित सदा चली आयी,
प्राण जाय पर वचन न जायी"
श्रूतकिर्ति भगवंताकड़े मागणी करतेय
"प्रभू, आप अयोध्या पधारे, आपका राज्याभिषेक हुआ, आप जब अयोध्या आये तो स्नान किया फिर राजपोशाख पहनी. प्रभूजी, चौदह वर्ष आपने जो वल्कल पहने थे वो उतारे हुये वल्कल मुझे प्रसाद रूपमें दिजीये"
श्रूतकिर्तिचे हे शब्द ऐकून प्रभू श्रीरामचंद्रासह सर्वच अवाक झाले
श्रूतकिर्ति प्रभूला म्हणते,
"प्रभू, वल्कल मागंना रघुकूल मे अपवाद है कितूं जिदंगी मे कब वनवास आये पता नही, अब जो सुख आया है उसमे हम भूल न जाये और यदि कल वनवास भी आया तो हम वो वल्कल देखकर त्याग और समर्पन के सिद्धांत इस खुशीमे भूल न जाये".
     प्रभू श्रीराम रघुकूलातील या सर्वात वयाने लहान परंतु विचाराने सर्वात मोठ्या असलेल्या श्रूतकिर्तिच्या हाती वल्कल सोपवतात
ही खरी रामराज्याची व्याख्या असावी
रामराज्य हे आत ह्रदयात यायला हवे
"सहज त्यांच्या ऐकता गोष्टी |
परमार्थ चित्ती दृढवेल ||"
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

नाही तरी संसारू जाईल रया

नाही तरी संसारू जाईल रया

     आत्ताच्या कलीच्या महान ताकदीच्या तावडीतून जीव सहजासहजी सुटेल अस वाटतच नाही. एखाद्याला इच्छा असली तरी स्वतःचे ताकदीवर तरी ते शक्य नाही. अध्यात्मिक ग्रंथ श्रवणाने वा संस्काराने मनुष्याचे मनाला कितीही समजावल व तत्वज्ञान शिकुन लोकांना कितीही उपदेश केला तरी तो  मनुष्य स्वतः मात्र मायेतुन बाहेर पड़लेला दिसत नाही. हि वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही. हा मायेचा प्रताप असतो.
     कलियुगात साधकाला अशी एखाद्या शक्तीची गरज आहे जी या कलीयुगातही उपयुक्त ठरेल
ती शक्ती म्हणजे "भगवंताची नामशक्ती व सदगुरूची कृपा" दळणाच्या जात्याला खालची व वरची अशा दोन तळ्या असतात. या दोन्ही तळ्या इतक्या वजनदार असतात की धान्याचा दाना त्या तळ्यांमध्ये गेला कि त्याचे पिठ होते. तसे परा प्रकृती आणि अपरा प्रकृती ह्या मायेच्या दोन तळ्या आहेत. या दोन्हीत कोणताही जीव एकदा सापड़ला कि तो भरड़लाच जातो. मात्र यातुनही वाचतो तो हे जाते ज्या खुट्यांवर असते. त्या खुंट्यापाशी एक छोटासा खड़्ड़ा असतो. हा खुटं म्हणजे सदगुरू व छोटासा खड़्ड़ा म्हणजे भगवननामाचा खड़्ड़ा. सदगुरूरूपी खुटांजवळ व हरिनामरूपी खड़्ड़ात जो जीव रूपी दाणा पड़ून असतो, त्याचे या दोन्ही तळ्या पिठ करू शकत नाही. हे जाते कितीही वेळा फिरत राहीले तरी हे थोडेसे दाणे सुरक्षितच राहतात.
    संताचे ,सदगुरूचे ह्रदय नवनितासमान असते अनादी संसार मालेत भरड़णारे जीवाची संत कबिरजीना दया येते,
"चलती चाकी देख के दिया कबीरा रोय,
दोउ पाटन के बीच में साबुत बचा न कोय."
     संत महात्म्ये जिवाला उपदेश करतात
मायेच्या जात्यात भरड़ण्यापेक्षा
"ये साते आलिया ओळंगा सारंगधरू"

जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

द्वारकेचा राणा पाड़ंवाघरी

द्वारकेचा राणा पाड़ंवाघरी

    भक्त म्हटल की निर्भयता व निश्चळ विश्वास असावा लागतो. भक्ताच्या ठिकाणी फक्त श्रद्धा महत्त्वाची नसते तर विश्वास हा त्याहून अतिमहत्वाचा असतो. श्रध्देचा जन्म होतो म्हणून श्रद्धा कालांतराने कमीअधिक होऊ शकते. परंतू, विश्वास हा अजन्मा असतो.
     हस्तिनापुरात एकदा धर्मराजाकड़े अचानकच एका सणाच्या निमित्ताने उत्सवाचे नियोजन करण्यात आले. या उत्सवासाठी भगवान श्रीकृष्ण उपस्थित असावे असी धर्मराजाची इच्छा होती. परंतु, उत्सवदिनाला अवधी इतका कमी उरला होता की द्वारकेला कोणी जाऊन परत येण्याइतपत दिवसही शिल्लक उरले नव्हते. आता या प्रसंगी धर्मराज चिंतातुर झाले. भीमदादा धर्मराजाला म्हणाले "दादा, उद्याच्या उत्सवासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्माला आणायची जबाबदारी माझी
आपन निश्चींत असावे व उत्सवाची उर्वरीत तयारी करावी" सर्व जण मिळून उत्सवाची तयारी करू लागले. अखेर उत्सवाचा दिवस उजाडला
सर्व जणांची धावपळ सुरु होती. तयारी जवळजवळ पुर्ण होत आली. तितक्यात धर्मराजाला भगवंताची आठवण झाली. मग भिमदादाची शोधाशोध सुरू झाली. बरेच प्रयत्नानंतर अखेर भिमदादाचा शोध पुर्ण झाला
भिमदादा एका निवांत ठिकाणी आपली गदा घासत बसले होते. धर्मराज तिथे येतात व भिमाला विचारतात "तु भगवंताकड़े निरोप घेऊन कुणाला पाठवले आहेस का?" तेंव्हा भिमदादा म्हणतो "दादा , काळजी नसावी, आपन ते काम माझ्यावर सोपवले आहे ना?,आपन तयारी करावी."
    धर्मराजा महालात आले सर्व पंगती बसल्या, भिमदादा म्हणतात, "पात्र प्रौक्षण करा". द्रौपदीने सर्वांना पात्र वाढून झाले तरी भगवान आले नाही. धर्मराज पुन्हा भिमाला म्हणतात, "अरे भिमा काय हे?" भिमदादा बाहेर येतात व आपली अत्यंत वजनदार गदा वरती आकाशात आपल्या सर्व ताकदीनिशी फेकतात. व भगवान द्वारकाधिशाला पुकारतात. "देवा! तुझ्या या भक्ताच्या जीवाचे रक्षण करावयाचे असल्यास प्रगट व्हा
नाहीतर या गदेखालीच मरतो....!!" आपल्या
भक्तांच्या अधिन असलेल्या भक्तवत्सल श्रीकृष्ण परमात्माने भिमाची गदा वरतून खाली पड़ण्यापुर्विच आकाशातच धरली. गदा हातात घेऊनच भगवान श्रीकृष्ण भिमाच्या समोर आकाशातून खाली आले. व भिमाला विचारू लागले. "अरे भिमा हा काय आततायीपणा !, इतक्या तातडीने मला कशासाठी बोलाविलेस?" भिमदादा देवाला म्हणतात, "देवा, वेळच नव्हता, मग काय करू? चला जेवायला...."
    केवढा हा आत्मविश्वास आणि ह्या आत्मविश्वासाबरोबर ही तयारी होती की गदेने समाप्त झाले तरी चालेल, कारण पाड़ंव हे भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. भक्तीमार्गात विश्वास असावा तो भिमाइतका... व मला वैयक्तिक तरी वाटते फक्त भिमानेच म्हणावे,
"नको ब्रम्हंज्ञान"
 व पाड़ंवा व संतानीच म्हणावे
"तुझे पायी मज झालासे विश्वास"
या भगवद् विश्वासापायीच ,
द्वारकेचा राणा पाड़ंवाघरी.

जय मुक्ताई

https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

Thursday, 29 September 2016

ऐसा पुरूषार्थी अगस्ती

ऐसा पुरूषार्थी अगस्ती

    पौराणिक काळातील महान तपस्वी महर्षी वशिष्ठांचे बंधू विद्यं पर्वताचे गुरू अगस्त्यजी असल्याचा उल्लेख महाभारतात आला आहे. प्राचिन काळी मेरू पर्वत हा सर्व पर्वतांमध्ये उत्तुंग पर्वत म्हणून गणला जात असे. त्यांची उंच उंच शिखरे पाहून विद्य॔पर्वत स्वताची उंची मेरू पर्वतापेक्षा आधिक वाढवण्याची जणू स्पर्धाच लागली. यामुळे सुर्य गमनामध्ये बांधा येत कालगणनेतही अंतर पड़ू लागले. उंचीच्या अभिमानही विद्यंपर्वतास दिवसेंदिवस वाढतच होता. तेंव्हा सर्व देविदेवतांनी अगस्तजींना विनंती केली. महर्षी अगस्त्यजी दक्षिण दिशेस गमन करत असताना विद्यं पर्वत अगस्त्यजींना वंदन करण्यासाठी आड़वा झाला व महर्षीना मार्ग मोकळा करुन दिला. महर्षीनी पुन्हा परत येईपर्यंत "जैसा आहे तैसा"
रहाण्याची आज्ञा केली, परंतू महर्षी अगस्त्यजी पुन्हा त्या मार्गांनी न आल्याने आजही तो पर्वत आड़वाच आहे. ऋषिचे उपकार म्हणून दक्षिण देशासाठी आजही संपर्क होतोय.
     भगवान शकंराच्या वरदान प्राप्तीने आतापी, वातापी व इल्वल हे तिन महाबलशाली दैत्य आपल्या आसुरी शक्तीच्या सामर्थ्यावर सर्वांचा कपटाने छळ करू लागले.

आतापी वातापी इल्वल |
तिघे दैत्य परम सबळ |
शिववरे महाखळ |
कापट्य सकळ जाणती ||

      या महादैत्यांनी देवी देवता वगैरे कुणालाही आपल्या कपटातून सोड़ले नाही. हे आपल्या मायावी शक्तीने,

अन्नरूप होय एक |
दुजा निजांगे होय उदक |
एक अन्नदाता देख |
होऊनी बैसे वनातंरी ||

 या तिघांपैकी एकाने अनछत्र माड़ायंच
एकान अन्न बनवायचे व एकाने पाणी बनायचे
असे हे महामायावी दैत्य होते. यांनी एकदा अगस्त्य ऋषीला आपल्या मायेने अन्न खायला दिले अन्न बनून एक भाऊ ऋषिच्या पोटात गेला पण म्हणतात,
हरिचीया भक्ता |नाही भय चिंता ||
अथवा
तुका म्हणे पोटी साठवीला देव |
    ज्या भक्तांने देवच आपल्या पोटात साठवीला आहे त्याला राक्षस वा विषारी अन्नही काय करणार? नियोजित ठरल्याप्रमाणे मोठ्याभावाने अन्न बनून ऋषींच्या पोटात गेलेल्या भावाला हाक मारली. येरवी तो विषारी अन्नही बनून पोटात गेलेला पोट फोड़ून बाहेर यायचा. महर्षी अगस्त्यजींनी आपल्या पोटावरून योगसामर्थ्याने हात फिरवताच तो आतल्या आत पोटातच भस्म झाला.
उदरावरी फिरवून हस्तगत |
दैत्य भस्म केला पोटात ||
   बरेचदा आपल्या भावाला आवाज दिला परंतू तो बाहेर येईना तेव्हा,
तव दोघे रूप धरिती थोर |
महाविक्राळ भयंकर |
धावले सत्वर |
ऋषीवरी ||
  तेव्हा महर्षी अगस्त्यजींनी वातापीला एक बाण मारला तर त्याचे शिर आकाशात उड़ून गेले.
आपल्या दोन्हीही भावांचा मृत्यू झालेला बघून
दोघे निमाले देखोन |
इल्वल पळाला तेथुन |
तव तो घटोद्वव क्रोधायमान |
पाठी लागला तयाचे ||
  अगस्त्यजी त्याच्या पाठिमागे धनुष्य बान घेऊन लागले सपुंर्ण भुमंड़ळात फिरला. परंतु,
पाठ न सोड़ी अगस्ती |
तव तो होऊनी कापट्यगती |
समुद्रजळी मिसळला ||
  अत्यंत क्रोधायमान झालेले ऋषीवर अगस्त्यजीनी ताबड़तोब आचमण करत सपुंर्ण सागरच ऐका आचमणात प्राशन केला व आपल्या उदरात साठविला. तेंव्हा समुद्रातील जलचर प्राणी पाण्याविना तड़फड़ू लागले. सृष्टी चक्र कोलमडून गेले. सर्व देवी देवता ब्रम्हा विष्णू महेश तिथे येऊन ऋषी अगस्त्यजीची विनवणी करू लागले. ऋषीवर शांत झाले, पुन्हा एका आचमणात प्राशन केलेला समुद्र अगस्त्य ऋषिनी देवांच्या विनंतीवरून मुत्राद्वारे विसर्जित केला. तेंव्हापासून आजवर समुद्र क्षारयुक्त होऊन खारट झाला. आजचा सपुंर्ण सागरच्या हि अगस्त्यजीची सृष्टीला देण आहे. समुद्र आहे म्हणून त्या पाण्याचे बाष्पीभवन होते व पुन्हा मेघाद्वारे त्यांची जलवृष्टी होते. असे महान परोपरी तपस्वी अगस्त्य ऋषीचं वर्णन करताना भगवान श्रीरामचंद्र म्हणतात,

म्हणे उदारा रघुपति |
ऐसा पुरूषार्थी अगस्ती ||
   या सुष्टीवर अनेक ऋषीमुनीचे उपकार आहेत
सध्या तर पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्ष म्हणजे ऋषीमुनींच्या ऋणातून उतराई होण्याचा पर्वकाळ
प्रत्येक मनुष्याचे हे सप्त ऋषीपैकीच ऐक गोत्र असते. श्राद्ध करणे म्हणजे पितंराच्या व ऋषीमुनीच्या ऋणातून मुक्त होण्याचा पर्वकाळ
माहिती स्रोत
"पहावे पुराणी व्यासाचीया"
जय मुक्ताई

https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

हरि मुखें म्हणा......

हरि मुखें म्हणा......

    माऊली ज्ञानोबारायांनी अनाथ संसारी जीवासाठी हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण करून साधे व सुलभ "हरि मुखें म्हणा" असा हितोपदेश केला.
   संसारी म्हणजे बायका मुले ज्याला आहेत तो संसारी इतकी संकुचित व्याख्या नसावी संतांच्या मते संसारीकाची जीवदशेला प्राप्त होऊन जगताला सत्य मानणारे व ज्ञानेद्रिंयाद्वारे जगताशी संबंध जोड़णारे सर्व संसारीच आहेत. असा जगताशी सबंध जोड़णारे ब्रम्हंचारी व वानप्रस्थीही संसारी लोकांच्या यादीतच येतात. संसारी म्हणजे गृहस्थाश्रमी इतका संकुचित अर्थ नसेल, संसारी शब्दाचा संसारात जन्माला आलेले सर्व जीव व मानवेत्तर पशु- पक्षी वनश्री- वृक्ष- लता सुद्धा संसारी मध्येच बसतात.
     गजेंद्राने व्याकुळ होऊन भगवंतास आर्त हाक मारली तर भगवान अतिवेगाने आले व त्याला सकंटमुक्त केले. गजेद्रं मानव न्हवता पन संसारी नक्कीच होता. अशा सर्वच संसारातील जीवांना संतमहात्मे उपदेश करतात.
"हरि मुखें म्हणा"
    संसारातील एखादा मुलगा लहान वयात जर अचानक परमार्थ  करायला लागला वा श्रीमद् भगवद्गीता वाचायला जरी लागला तर त्या मुलाचे घरचे म्हणतात, "कारे....गीता वाचुन तुला संन्याशी व्हायचे आहे का?"
बोलणारे विचार करतच नाही, गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण ही संन्यासी नव्हता व गीता ऐकणारा अर्जुन तरी कुठ संन्याशी होता. आणी भगवदगीता श्रवण करून अर्जुनाने संन्यास घेतल्याचे ऐकीवात नाही. वस्त्र संन्यास म्हणजे पुर्ण संन्यास नव्हे, केवळ अग्नीला न शिवणारा वा क्रिया न करणारा हा संन्यासी भगवंताला तरी कुठे मान्य आहे. उलट कर्मफलाचा त्याग करत अनश्रित होत कर्तव्यकर्म करणारा हा पुर्ण संन्यासी
अशी भगवान परमात्माची संन्यास्याची व्याख्या व इच्छा आहे.
     केवळ बाह्य पदार्थाचा त्याग दाखवत अंतकरणाने संसाराशीच मोह तो कसा संन्यासी ठरेल. मोह हा तर बंधनकारक आहे, म्हणून संत महात्म्ये दोनवेळा दुरूक्ती करून जीवाला हितोपदेश करतात,
हरि मुखें म्हणा...
हरि मुखें म्हणा...

जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

वैराग्य यासी म्हणो आम्ही

वैराग्य यासी म्हणो आम्ही....

    महाभारतातील एक प्रसंग आहे. आपल्या स्वबळाने अर्जुन सशरीर स्वर्गात इद्रंसभेत गेला तेंव्हा अर्जुनाचे स्वागतासाठी उर्वशी,रंभा आदी स्वर्गलोकीच्या अप्सरानी नृत्य केले. अर्जुनाच्या रूप व व सौंदर्यावर मोहीत होऊन उर्वशीने अर्जुनाकड़े कामावासनेची इच्छा प्रकट करत निवेदन केले. यात काहीही गैर नाही, दोष लागत नाही असे अनेक नाना प्रकारचे तर्कही सागितंले, परंतु आपल्या दृढ इंदियसयंमाचा परिचय देत अर्जुनाचे उर्वशीप्रती उद्गार आहेत.

गुच्छ मुर्घ्ना प्रपंनोऽस्मि पादौ ते वरवर्णिनी |
त्वं हि मे मातृवत् पूज्या रक्ष्योऽहं पुत्वत् त्वया ||

    माझ्या दृष्टीमध्ये कुंती,माद्री व शचि यांना जे स्थान आहे तेच तुझे देखील आहे. तू माझ्यासाठी मातेसमान पूज्य आहेस, मी तुझ्या चरणावर प्रणाम करतो. तू तुझा दुराग्रह सोडून परत जा.

   अर्जुनाने इतके समाजावूनही उर्वशी अनेक आमिष दाखवू लागली. परंतु अर्जुनाच्या दृढ संयमी वृतीत तिळभरही बदल झाला नाही. शेवटी उर्वशीने संतप्त होऊन अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप दिला.
    अर्जुनाने हसत हसत आनंदाने तो ही शाप स्विकारला. परंतु संयम सोड़ला नाही. जो मनुष्य आपल्या आदर्शापासुन हटत नाही, धैर्य व सहनशीलतेला आपल्या चारित्र्याचे भुषण बनवितो, त्याला शाप देखिल काही करू शकत नाही. उलट शाप देखिल वरदान ठरतो.
     पुढे बारा वर्षे वनवास व ऐक वर्ष अज्ञात वासात हा शापच वरदान ठरला. हि वार्ता स्वर्गाचा राजा इद्रांला समजली तेंव्हा इद्रांचे उद्गार आहेत.    "अर्जुना तू तर तुझ्या इंद्रियसयंमाद्वारे ऋषिमुनीनांही पराभूत केलेस तुझ्या सारख्या पुत्राला जन्म देणारी कुंती या जगातील सर्वश्रेष्ठ माता ठरली आहे".
     आपले पैठण निवासी शातीब्रम्हं एकनाथ महाराज अर्जुनाचे वैराग्याचे गुणगौरव करतात.

धनधान्यादी सकळ राशी |

घेऊनी पातली स्वये उर्वशी |
थुंकूनीया न पाहे तिसी |
वैराग्य यासी म्हणो आंम्ही ||

    किती छान वाटत फक्त वाचायला व फक्त ऐकायला......

जय मुक्ताई

https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/


https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

देव

देव
     दिव धातुपासून झालेला शब्द म्हणजे देव
देव या शब्दात मूर्त्य देवता, अजान देवता ,झालेले देव ,केलेले देव वगैरे बरेच देव येतात या पचंभौतीक सृष्टीवर या देवंताचे गुप्त असे अनुशासन असते . ज्या देवतेचे प्राप्ती पुण्य करून मिळवता येते ति मर्त्य देवता शभंर अश्वमेघ यज्ञ बिनचुक केले की इद्रंपद मिळते परंतू इंद्र हा अनुशासक देव आहे.


क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशंती

    ते पुन्हा परत मृत्यूलोकात माघारी येतात अजाण देवता या कल्पाच्या आरंभापासुन कल्पाच्या शेवटपर्यंत अनुशासनासाठी असतात
उत्पती,स्थिती(रक्षण) व लय (प्रलय) ह्या साठी ब्रम्हां,विष्णू व महेश हे देव आहेत यांना अजान देव म्हणतात.
      दगड़ाला शेदुंर लावला की झाला देव हे केलेले देव . देव शब्दाचा प्रयोग अनेक ठिकाणी केला जातो , संत मात्र याही पुढे जाऊन म्हणतात,

देखीला देखीला माये देवांचा देव

किंवा

देखीला देखीला देवाधिदेव बरवा

संताना अपेक्षीत असलेला देव म्हणजे,

जयापासून सकळ महिमड़ंळ हे झाले

  असा जगाचा पालनकर्ता असनारा देव सतांना अपेक्षित आहे
पितामहस्य जगतो माता धाता पितामहः|
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्स्माम यजुरेव च|मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्||
   ज्याचा पासुन सर्व देव निर्माण झाले असा जो देव तो
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
तोच सर्व संत, महंत, ऋषीमुनीं, वेद शास्त्रे व पुरानांना अपेक्षित असलेला देव म्हणजेच
नाही घड़विला नाही बैसविला
असा
तो हा देवाधिदेव बरवा
बळिया माझा पढंरीराव
जय मुक्ताई
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Wednesday, 28 September 2016

पुरे पुत्र माय एकची पोटी

   भारताच्या इतिहासात अनेक महान रत्नापैकी सदगुणाचा सागरच जणू असे देवरात
विद्यासपंन्न व वैभवसपंन्नही
याच प्रतिष्ठेला साजेल अशा सुशील व सुंदर सुनंदा नामक कन्येशी यांचा विवाह झाला
म्हणतात ना चांगल्या गोष्टीला कुणाची तरी दृष्ट लागतेच
अनेक वर्षे या दापंत्याला पुत्रसुख मिळाले नाही
सुनंदाच्या मातृह्रदयाला जणू पुत्र प्राप्तीची तहानच लागली होती
पुत्रप्राप्तीसाठी एक मोठा यज्ञ केला तेंव्हा आकाशवाणी झाली
*दैवी लोकोत्तर चैतन्य सुनंदाच्या उदरी जन्म घेईल*
फाल्गुन शुद्ध पचंमीला ऐक अलौकिक व चैतन्यमय बालकाचा सुनंदेच्या पोटी जन्म झाला
मुर्तीमंत तेज व साकार ब्रम्हंच जणू पृथ्वीवर अवतरले
मोजीबंधन करून या बालकाचे नाव ठेवले
*याज्ञवल्क्यं नारायणं नमस्कृतं*
बालपणीच वैदिक तपस्वी बालक सुनंदाच्या मांडीवर खेळू लागले
आनंदात सात वर्षे निघून गेली
वैदिक धारणे नुसार मुंज झालेले संतान आपले रहात नाही
त्याला गुरूगृही पाठवावे लागते
वैशंपायन ऋषीकड़े शिकायला पाठवले
तो ऋषीमुनींचा काळ म्हणजे आजच्या सारखा कागद पेन्सिलचा न्हवता
गुरूची जिव्हा हिच पेन्सिल

शिष्याचा मेंदू हाच कागद
गुरू जे जे बोलणार ते ते शिष्य आपल्या मेंदूतच नोंदवून घेत
ह्रदयाबरोबर ह्रदय बोलत होते
त्यात ज्ञान उत्क्रांत होत गेले
त्याकाळी गुरू ज्ञान सांगत जायचे

विद्यार्थी ग्रहण करत असे
*स्वयमेव मृगेंद्रता* अशेच ऋषीवर कुलपती होते
वैशंपायन ऋषीच्या आश्रमात सात वर्षात याज्ञवल्काने सारा यजुर्वेद पुरा केला
केवढी धारणा शक्ती व स्मरणशक्ती असेल
पुढे उद्यालक आरूणी ऋषीकड़े जाऊन पुढील अभ्यास सुरु केला
नतंर शाकल्यमुनीच्या आश्रमात ऋगवेद संहिता शिकण्यासाठी याज्ञवल्कजी गेले
थोडेच दिवसात ज्ञान संपादन करून प्रतिभाशाली बनले
कुठल्याही गोष्टीला राजाश्रय लागतोच
म्हणतात ना
*पंडिता वनीता लताः आश्रयाविन न शोभंती*
शाकल्यमुनीच्या आश्रमाला राजाश्रय होता तो विद्याव्यासंगी सुप्रिय राजाचा
आश्रमातील पवित्र तिर्थ रोज राज्याला पाठवले जायचे
एक दिवस कुणी शिष्य जवळ न्हवता म्हणून याज्ञवल्कजींना तिर्थ घेऊन राजदरबारी पाठवले
हे तिर्थ घेऊन गेले असता तिथे बघता तर
*कामातुराम् न भयंकर न लज्जा*
असे चित्र दृष्टीस पड़ले
गुरुजीची आज्ञा मोड़ली जावू नये याही अवस्थेत याज्ञवल्कजी सुप्रिय राजाला विचारतात
हे आश्रमातील तिर्थ कुठे ठेवू
राजा उद्धटपने म्हणाला
फेक त्या लाकड़ी खाबांवर
याज्ञवल्कजीनी ते तिर्थ खाबांवर फेकताच काय आश्चर्य?
त्या जड़ निष्प्राण खाबांवर चैतन्य निर्माण होऊन सारा खांब पल्लव व पुष्पांनी बहरून आला
आजच्या वैज्ञानिक युगात हे कदाचित नवल वाटेल
हा चमत्कार बघून राजा घाबरला
स्वतःची चुक कळली
तिर्थाचे महात्म्य कळाले
याज्ञवल्कजीची माफी मागीतली
परंतू याज्ञवल्कजी विनंतीने विरघळले नाहीत
राजा
लक्षात ठेव
या तिर्थाचे अपमानाचे फळ तुला भोगावेच लागेल
असे बोलून तिथुन शाकल्यमुनीच्या आश्रमात आले

गुरुजीना सांगितले
सुप्रिय राजा उन्मत आहे
आपल्या आश्रमाचे पवित्र तिर्थ असल्या उन्मत सत्ताधिशांकरीता नाही
असे मला वाटते
उन्मत व सत्ताधिशांपुढे मस्तक नमवायला याज्ञवल्क जन्माला आलेला नाही गुरूजी
असल्या लोकांचे मदतीवर आश्रय चालविण्यापेक्षा तो बंद केलेला बरा.
शाकल्यमुनी अत्यंत चिंतातुर झाले
शेवटी राजाश्रयाचा प्रश्न होता
याज्ञवल्कजी तिथून निघून पुढे पुन्हा वैशंपायन ऋषींच्या आश्रमात विद्या संपादनाकरीता आले
विद्याभ्यास सुरु झाला
एक दिवस अचानक वैशंपायन ऋषी पहाटे स्नानाला जात असताना उठायला उशीर झाला व घाईघाईत अंधारातच बहिणीच्या छोट्या बालकांचे अंगावर पाय पड़ला
बालक गतप्राण झाले
गुरुजीना ब्रम्हंहत्येचे पातक लागले
प्रायश्चित करावे तर लागणार
सर्वस्व सोडून तिर्थयात्रेला निघायचे
हजारोचे प्रेरणास्थान वैशंपायन ऋषी
आपल्या गुरूजींना झालेली शिक्षा याज्ञवल्काला आवडली नाही
ते अतिशय भावविवश झाले
त्या अवस्थेतच गुरूजीना म्हणाले
गुरुजी
तुमचे प्रायश्चित मी घेतो

तुम्हाला पापमुक्त करतो
याज्ञवल्कजीचे हे शब्द ऐकून आताचा एखादा लौकीक गुरू भाववश झाला असता
परंतू
याज्ञवल्काचे ते शब्द वैशंपायन ऋषीला लागले
त्यांचा अंहम जागा झाला
ते म्हणाले
याज्ञवल्का
तुला ज्ञानाची मस्ती चढली आहे
त्या धुंदीत तू वाटेल ते बोलत आहेस
याज्ञवल्कजीनाही गुरूजींचा आरोप सहन झाला नाही
ते म्हणाले
तुमच्याकड़े विद्या शिकलो म्हणून तुम्ही असे म्हणतात ना?
हवी तर तुमची विद्या तुम्हाला परत करतो
असे म्हणून त्यांनी सारा यजुर्वेद ओकत बाहेर टाकला

आश्रम सोडून निघून गेले
ओकलेली विद्या परत घेतली नाही तर नष्ट होईल म्हणून नाईलाजाने परत घ्यावीच लागली
ति ओकलेली विद्या म्हणून तैभिरीयशाखा म्हणून आजही ओळखली जाते
यालाच काळा यजुर्वेद असेही म्हणतात
आश्रमातुन निघत याज्ञवल्कजी वनात निघून गेले

*तत्सवितुर्वरेण्यं* कर्मयोगाचे आदर्श भगवान सुर्यनारायणाची उपासना करू लागले
त्यादिवसापासुन त्यांचे जगंल हेच विद्यापीठ व इश्वर हाच कुलपती बनला
भगवान सुर्यनारायण प्रसन्न झाले
सुर्यदेवाचे ज्ञान व सरस्वती मातेचे शब्द घेऊन स्वतंत्र वेद निर्माण केला
नव्या वेदाचा उद्गाता म्हणून सर्व ऋषीकूळ त्यानां वंदन करू लागले
तेंव्हा पासुन याज्ञवल्कजींना
योगेश्वर याज्ञवल्क म्हणतात
सुनंदा मातेच्या ड़ोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले
*कुलंपवित्रं जननी कृतार्था...*
तिचे मातृपद सफल झाले
तिच्या मातृवेदना सार्थकी लागल्या
संत महात्म्ये म्हणतात
भगवंता
असा ऐकच पुत्र पोटी यावा
त्यांने ऋषीऋण देव ऋण पितृऋण फेड़ावे
*पुरे पुत्र माय ऐकची पोटी!हरिस्मरणे उद्धरे कुळेकोटी!!*
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
सकंलण सदंर्भ-
*पहावे पुराणी व्यासाचीया*
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

पढंरीची वारी

पढंरीची वारी
 
    श्रीविठ्ठल या एका शब्दांने महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबरच लोकजीवनावर गेल्या शेकडो वर्षांपासून टाकलेली मोहिनी आज २१ व्या शतकातही कायम आहे. नव्हे रोज नित्यानित्य वाढतच आहे.
    महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून, शहरातून निघालेल्या दिंड्या पंढरीच्या वाटेवर चालत असतात पंढरपुरात विटेवर उभा असलेला हा समचरणी देव ‘विठ्ठल’ केंव्हा एकदा माझ्या भक्तांना बघतो असे त्यास होऊन गेले आहे. तर भक्तही त्याच्या दर्शनासाठी व्याकूळ झाला आहे.
पंढरीची वारी हा वैष्णवांसाठी एक ‘आनंदसोहळा’. ज्या वाटेवरून वैष्णव जात आहेत ती संतांनी सिद्ध केलेली वाट असल्याने ती आनंदरूपच आहे. विठ्ठलभक्तांंच्या पायांना त्रास जाणवू नये म्हणून या वाटेवरील दगडगोटे या काळात मऊ लोण्याचे गोळे झालेले असतात.
    कर्म आणि ज्ञान या दोन्ही मार्गांना ओलांडून उपासनेचा मार्ग प्रचलित झाला. या मार्गाला ‘भागवतधर्म’ असे नाव पडले.
महाराष्ट्रातील संतांचा मार्ग हे भागवतधर्माचे विशुद्धरूप आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करणार्‍या लोकांचा हा धर्मसंप्रदाय आहे.
    वारी करताना समूहाने चालत, नाचत, गात, खेळ खेळत जायची परंपरा आहे.
 वारी हीच विठ्ठल दैवताच्या उपासनेची पद्धत आहे.
पंढरीला जायचे ते विठ्ठलाच्या भेटीसाठीच.
विठ्ठलाला भेटायचे म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नव्हे.
    बरे त्याला भेटायला जायचे म्हणजे एकट्याने नव्हे तर गावच्या अनेकजणांना सोबत घेऊनच संसाराचा भार पांडुरंगावर सोडून वारीत उच्चनीचतेच्या भावनेला थारा नाही.
 प्रत्येकजण एक दुसर्‍याला मानाने वागवितो.
‘माउली’ म्हणून हाक मारतो, पाया पडतो.
क्रोध अभिमान केला पावटणी|
एक एका लागती पायी ||
    येथे आपला अहंकार सोडून परस्परांविषयी प्रेमाची व आदराची भावना बाळगली जाते.
दिवसभर पायी पायी चालायचे, थकून उघड्या माळरानावर रात्रीचा मुक्काम करायचा, स्वयंपाक, भोजन, झोप व प्रात:स्नान करून परत पुढची वाटचाल सुरू करायची. आणि हे सलग ४०/४५ व १८/२० दिवस. ऊनपावसाची तमा न बाळगता हा एवढा उत्साह कशासाठी? तो आहे विठ्ठलाच्या भेटीसाठी.
विठ्ठल नवसाला पावणारा देव नव्हे.
त्याला नवस बोलले जात नाहीत
फक्त
आठविन पाय हा माझा नवस
 त्याचे दर्शन घेतल्याने एक आध्यात्मिक अनुभूती मिळते. अशी अनुभूती की त्यात विश्‍व सहभागी होते. त्याचे दर्शन घेतल्याने त्याचा भक्त आनंदाने चिंब होतो. भक्ताला पाहून विठ्ठलही आनंदून जातो. राऊळातून बाहेर येत तो आपल्या लाडक्या भक्तांत मिसळून जातो. त्याची उराउरी भेट घेतो. त्यांच्याशी एकरूप होतो. या सावळ्या गोजिर्‍या परब्रह्माला बघितल्यानंतर वारकर्‍यांचा शिणवटा गळून पडतो आणि त्याच्या समचरणी एकरूप झाल्याचा आनंद तो घेतो. पुढील वर्षीच्या आषाढीवारीला येण्यासाठी लागणारी ऊर्जा तो विठ्ठलाच्या मिठीतून अनुभवतो.
वैष्णवांना लागते ती पुढिल वारीची
पढंरपुरला श्रीविठ्ठल दर्शनासाठी महाराष्ट्रातनु अनेक संताच्या पायी पालख्या दर्शनासाठी येतात
त्यात सर्वात पहिले निघते ती आदिशक्ती मुक्ताईची पालखी
व तद्नंतर श्रीगुरू निवृतीनाथ पालखी सोहळा
हे दोन्हीही सोहळे पढंरीला पोहोचण्यासाठी व पुन्हा परतीच्या वारीला बहुदा इतर पालखी सोहळ्याचे तुलनेत भाविकांचे जास्त दिवस मोड़तात
म्हणून आदिशक्ती मुक्ताई व श्रीगुरू निवृतीनाथ दादांनी अशा दोन साधकांकरवी या दोन्हीही पालखी सोहळ्याचे दिवस कमी करून पालखी साठी राजमार्ग असावा असी सकंल्पना भक्तांकरवी पुढे आली
संवादात्मक चर्चाही सुरू झाली
गतानुगतीक न्यायाला अनुसरून परपंरेचे अवड़ंबर यातुन पुढे आले
परंपरा हि भक्तांच्या हिताची असावी
एक मात्र मज आम्हां पामरांना विस्वास आहे
ज्याअर्थी श्रीगुरू निवृतीनाथ व आईसाहेब मुक्ताईनी साधंकाकरवी हि गोष्ट सकंल्पनेत आणली
ती भगवान पढंरीनाथांच्या कृपेने लवकरच पुर्णत्वाला जाईल हा दृढ विस्वास आहे
ज्यादिवशी भक्तांना अपेक्षित असा दोन्हीही पालखी सोहळ्यात मार्ग बदल होत राजमार्ग होईल
तुका म्हणे आले समर्थाचे मना |
जरी होय राणा रंक त्याचा ||
तो दिवस भक्त परिवारासाठी आनंदाचे असेल
आईसाहेब व श्रीगुरू निवृतीनाथ महाराज यांचे एक निष्ठावान भक्त व साधक
ह भ प सागरजी दौड़ं
 व
ह भ प प्रफुलमाऊली यांचा आज जन्म दिवस
आम्ही अज्ञानी पामर आपल्या सारख्या निष्ठावान साधकांना काय शुभेच्छा देणार....
भगवान पढंरीश परमात्माकड़े आजच्या मगंल हरिदीनी ऐकच मागणी करूया
हे पाड़ुरंगा
या आपल्या असंख्य भक्तांच्या या सार्थ मागणीला लवकरच यश दे..
जय मुक्ताई
ऋणनिर्देश
चैतन्याचा जिव्हाळा परिवार
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

Monday, 26 September 2016

विश्वी विस्तारली किर्ती तुझी

 विश्वी विस्तारली किर्ती तुझी

    तुकोबांचे काव्य प्रासादिक व रसभरित असल्याने ते प्रत्येकाच्या जीभीवर नाचू लागले
बाया बापड़्या जात्यावर अंभग म्हणू लागल्या
तर पुरूषवर्ग शेतात महाराजांची गीते गाऊ लागला
महाराजांचे किर्तनास गर्दी जमुना लागली
परंतू
याचा विपरीत परिणाम काही लोकांवर झाला
महाराजांना शुद्र म्हणत धर्मद्रोही ठरवले

त्या काळचे दशग्रंथी पंड़ित वाघोलीचे न्यायशास्री रामेश्वर भट्टाकड़े तक्रार नोंदवली
रामेश्वर शास्त्रीनी देहूच्या पोलीस पाटलाकरवी महाराजांना गावात रहावयास बंदी आनली
*कोपला पाटील गावचे हे लोक!आता मज भिक कोण घाली!!*
भगवान परमात्मावर महाराजांनी सर्व भार सोपवत भक्ती सुरु ठेवली
पुढे रामेश्वर शास्त्रीचा विरोध वाढतच गेला
एक दिवस देहूत येऊन अंभगगाथाच इद्रायंणीत बुड़वावी
असा हुकूमच सोड़ला
तेरा दिवसांनी अंभग पुन्हा तरले
 हि महाराजांची परमार्थ फलश्रुती होती
एक दिवस रामेश्वर शास्त्री पुण्यास जात असताना उन्हाळ्याचे त्रासाने एका विहिरीत स्नानासाठी उतरले
सदरची विहीर अनगड़शहा नावाच्या फकीराची होती
तेथे फक्त तो फकीरच स्नान करत असे
शास्त्रीला स्नान करताना बघुन अनगड़शहाने श्राप दिला
*ऐसे ही ड़ुबते रहो*
रामेश्वर शास्त्री पाण्याचे बाहेर येताच अंगाचा दाह होऊ लागला
अनेक नानाविध उपचार केले परंतु जैसे थे परस्थिती होती
आराम पड़ेणा म्हणून आळंदित येऊन ज्ञानोबारायांजवळ अनुष्ठान करत बसले
माऊलीनी स्वप्नात दृष्टांत दिला
*तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर!जो का अवतार नामयाचा!!*
तुझ्या हातुन त्यांची निंदा झाली म्हणून तुला हि बाधा झाली
याकरिता आपन देहूला जाऊन तुकोबारायांची शरणागती करावी
शास्त्री बुवा देहूला आले
महाराजांच्या चरणी लोटागंण घातले
महाराजांच्या
नुसत्या हस्तस्पर्षानेच अंगाचा दाह शातं झाला
या दिव्य प्रचिती नतंर रामेश्वर शास्त्री म्हणतात
*पंडित वाचक अथवा दशग्रंथी!परि सरी न पवती तुकयाची!!*
सपुंर्ण गर्व अभिमान नाहीसा झाला व लोकांना अंभगातून शास्त्री बुवा सांगु लागले
*चहू वर्णासिही आहे अधिकार!करीता नमस्कार दोष नाही!!*
रामेश्वरशास्त्री तुकाराम महाराजांचे कट्टर शत्रू पण अनन्य भक्त बनले
*भक्ति ज्ञान आणि वैराग्य आगळा!ऐसा नाही ड़ोळा देखीयेला!!*
महाराजांच्या चरणांवर साष्टांग प्रणिपात करत म्हणतात
*दया दीनानाथा तुवां जीवविली!विश्वी विस्तारली किर्ती तुझी!!*
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
सदंर्भ-किर्तनात ऐकलेले लिहीले
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ।

तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ।

तर्काने चालणाऱ्या लोकांत म्हणजे त्यांच्या तर्कात शक्ति नसते.तर्कामुळे निव्वळ एखाद्या चांगल्या विषयालाही फाटे फुटतात.फक्त तर्काने दृढनिश्चय होत नाही.हे पण चांगले ते पण चांगले असच वाटत राहत.डोळ्यांसमोर अनेक वाटा दिसतात.कोणत्या वाटेने वाटचाल केल्यावर इच्छित स्थळी पोहचू ते ठरत नाही.त्यामुळे लिहणे वाचणे शिकणे जरी कमी झाले तरी हरकत नाही.पण हृदयात प्रेम आणि भक्ति मात्र असलीच पाहिजे.आळसाला आणि अहंकाराला तिथे आळस नको.तुकोबाराय कलियुगातील लोकांना सांगून गेलेत.
कलिमध्ये दास तुका।जातो लोका सांगत
जय हो
जय मुक्ताई🚩
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

दिसामाजि काही तरी ते लिहावे

दिसामाजि काही तरी ते लिहावे

    समर्थ रामदासांचे हे वचन आहे.दररोज काही तरी लिहावे.मनुष्याचा बराचसा वेळ हा विचारात जातो.हा विचार च जेव्हा लेखणीतून बाहेर पडला तर ? आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,एखादा केलेला प्रवास,कीर्तन-प्रवचना सारख्या संत्संगातून ऐकलेल्या गोष्टी,दृष्टांत जर आपण रोज लिहून ठेवायची सवय लावली तर ? तर एक प्रकारे,स्मरणाची,चिंतनाची अनुशीलनाची सवय लागते.रोज आपण दैंनदिन लिहू शकत असू तर तो एक प्रकारचा जपच म्हणावा लागेल.आज सोशल मिडियाच्या युगात लिहण कमी आणि दुसऱ्याने लिहलेलचं पाठवणे कधीकधी तर ते आपलचं नाव जोडून पाठवणं असे प्रकार घडत राहतात.यालाच *copy pest* असं  आपण म्हणतो.  आम्हांला आत्मनिर्भर बनायला हवं तर आमचा आंतरिक विकास व्हावयाचा अभ्यास वाढावयाचा तर लिहणं हा जप हवाचं. आयत्यावर बैत किती दिवस..... *म्हणून दिसामाजी काही तरी ते लिहावें.*
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

ब्रम्हादिका ज्याचा न कळेची पार

ब्रम्हादिका ज्याचा न कळेची पार

द्वापारयुगात
पापी जे अभक्त दैत्य जे मातले |
धरणीसी झाले ओझे त्याचे ||
ऋषीमुनीना हे आसुर त्रास देऊ लागले
राहियेले यज्ञ मोड़ीले किर्तन |
पळाले ब्राह्मण दैत्यां भेणे ||
   तेव्हा गाईच्या रूपात पृथ्वी ब्रम्हंदेवापाशी गाह्राणे सांगु लागली. भगवान शिवजी, इंद्रदेव,व ब्रम्हंदेव सर्व मड़ंळी क्षिरसागरात भगवान श्रीहरि विष्णूकड़े आली. भगवान परमात्माला वदंना करून स्तुती करू लागले. तेंव्हा तिथे आकाशवाणी झाली.
देवकीच्या गर्भा येईल भगवान |
रक्षिल ब्राह्मण गाईभक्त ||
   भगवान परमात्माचे अवतार प्राकट्य मथुरेत झाले. पुढे भगवान नंद यशोदेच्या घरी रांगु लागले.
रांगत रंगणी चोरीत लोणी धावुनी धरती गौळणी वो 
   रांगता रांगता लोणी चोरत खोड़्याही करू लागले. अनेक गाह्राणी येऊ लागली.
ऐसे ऐकता गाह्राणी |
यशोदे नयनी आले पाणी ||
तेव्हा यशोदा माता भगवान श्रीकृष्णाला म्हणते
उद्या जाई राना |सवे घेऊनी गोधना ||
   मग भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड़्या सोबत खांद्यावर काबंळी व हातात काठी घेऊन रानात गाई चारू लागले. एक दिवसाचा प्रसंग ब्रम्हंदेवाचे मानसपुत्र नारदजी तिन्ही तालात गमण करत करत ब्रम्हंदेवाच्या दर्शनाला आले. असता ब्रम्हांजी विचारतात, नारदा त्रैल्योक्यातील काही विशेष वार्ता आणली काय? तेंव्हा नारदजी म्हणतात,
ऐक नवलाईची वार्ता आहे. मृत्यूलोकी यमुनेच्या तिरावर एका गवळ्याच्या घरी बालक रूपाने परब्रह्म परमेश्वराने अवतार धारण केला आहे
आणी भगवान परमात्मा आपल्या सवंगड़्याना वैकुंठातही दुर्लभ असा काला वाटतात
व तो अवतार त्रैलौक्याला पुज्य आहे. नारदजीची ही वार्ता ऐकून क्षणभर ब्रम्हंदेव अवाकच झाले
स्वर्गीचे सर्व देव मृत्यूलोकी वेष पालटून आले
कारण मुळ स्वरुपात जावे तर हे गवळ्याचे पोर आणि आम्ही देव हा अंहकार जागा झाला
या देवांनी गोपाळांच्या उचिष्ठासाठी पाण्यात मास्याचे रूप धारण केले. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोपाळांना सांगितले. आज यमुनेवर कोणीही पाणी प्यायला जायचे नाही. अशा रितीने भगवान श्रीकृष्णानी,
काला वाटीता विधाता येणे ठकविला
  ब्रम्हंदेवाचा अंहकार जागा झाला श्रीकृष्णाची खोड मोड़ावी म्हणून सर्व गायी वासरे व गोपाळ यांना एकदम गुप्त करून सत्यलोकात घेऊन गेला
म्हणतात ना
चतुरा तु शिरोमनी |
गुण लावण्याची खाणी ||
  भगवान परमात्माने ब्रम्हंदेवाची हि कृती ओळखली
इच्छामात्रे करी ब्रम्हांड़ाच्या कोटी |
त्यासाठी काय गोष्टी अपुर्व हे ||
भगवान हसले
गायी वत्सगोपाळ केलीसे निर्माण |
न लागता क्षण परिक्षिती ||
   व आपल्या मायेने पुन्हा त्यानेच गाई वासरे व गोपाळांचे रूपे स्वतःच घेतली
सायंकाळी गेले गोकुळा भितरी |
आपुलाल्या परी घरी सर्व ||
   संध्यासमयी सर्व गायी गोपाळासह गोकुळात गेले असा क्रम वर्षभर सुरू होता. भगवंताने स्वतःच सर्व गायी गोपाळांच्या रूपात विहार केला
ईकडे ब्रम्हदेवाने वर्षभर वाट पाहीली कि, श्रीकृष्ण मला शरण येईल. एक दिवस ब्रम्हदेव कंटाळून गोकुळात जाऊन बघतो तर सर्व काही जसेच्या तसे गायी वासरे चरत होत्या व भगवान गोपाळांत नानाविध खेळ खेळत होते . ब्रम्हंदेव मनाशीच विचार करू लागला. हे सर्व इथेच आहे
मग मी सत्य लोकांत नेले कुणाला? पुन्हा सत्यलोकांत जाऊन पहातो तर तिथेही तेच गोपाळ गाईवासर ब्रम्हदेव अक्षरशः भाबांवला
भगवान श्रीकृष्णाच्या चरणी लोटागंण घालुन स्तुती करू लागला. तेंव्हा सर्व कृष्णमय दिसु लागले
भगवंताची निट स्तुतिही करता येईना
त्याने सत्यलोकात जाऊन ति गाईवासरे व गोपाळ परत आणून दिले.
जयाचिये नाभी जन्म चतुरानना
त्या
ब्रम्हादिका ज्याचा न कळेची पार |
मानवा विचार न कळेची काही ||
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

विकाल तेथे विका | माती नाव ठेवुनी बुका ||

विकाल तेथे विका |माती नाव ठेवुनी बुका ||

    शतकोटी तुझे करीन अंभग असी प्रतिज्ञा करणारे नामदेव महाराज यांच्याकड़ुन ९४,४९,००,०००  इतकी अंभग संख्या पुर्ण झाली
पुढे नामदेव महाराज व पाड़ुरंगानी तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन
उरले ते शेवटी लावी तुका |
   ईश्वरी साक्षात्कार झाल्यावर महाराजांच्या प्रासादिक वाणीतुन जे जे निघाले ते सर्व अंभगरूपच झाले व विकल्पी जनांचे पित्त खवळू लागले. पुराणात वाल्मीकी व व्यासादीक यांच्यासारखे महात्म्ये देखिल निदंकाच्या कचाट्यातून सुटले नाही. सुर्याचा प्रकाश पाहून ड़ुड़ुळाला काहीही नस्त्या कल्पना सुचणारच की.
एखाद्या दाताचा लौकीक वाढू लागला की कृपनाकरवी त्याचा धिक्कार न होईल तर नवलच की. गंधर्वाचे गायन चालले असले तरी एखादा गदर्भराज आपला स्वर काढल्यावाचून राहातच नाही. ईतकेच काय एखादी सुदंर कपिला गाय असली तरी कसाई तिला कधी पुज्य मानतच नाही
हि फार पुर्वपार चालत आलेली परंपरा आहे
मग यातून तुकाराम महाराजांचे अंभग कसे सुटले असतील. तुकाराम महाराजांना छळण्यासाठी विरोधी मड़ंळीनी नाना प्रयोग केले परंतु यश येईना.
     याच काळात देहू गावात सालो मालो नावाचे दोन कवी होते. त्यांचे काव्य तुकाराम महाराजांच्या प्रासादिक वाणीपुढे निष्प्रभ ठरू लागले त्यामुळे ते महाराजांचा अधिकच द्वेष करू लागले. त्यांच्या ड़ोक्यात एक सुपीक कल्पना सुचली त्या सालो मालो ने तुकाराम महाराजांचे अंभगातच तुका म्हणे काढुन आपली नाव घालुन आपले काव्य श्रेष्ठ ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले. लोकांच्या हा सर्व प्रकार लक्षात येऊ लागला
तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्या सालो मालोला आपल्या प्रासादिक अंभगवाणीतुन उपदेश केला
नाही घाटावे लागत |
एका शिते कळे भात ||
सालो मालो हरिचे दास |
म्हणवूनी केला अवघा नाश ||
असे संताचे अंभगवाणी चोरून आपल्या नावावर खपणारेंना महाराज म्हणतात
तुका म्हणे चोरा |
होय भुषण मातेरा ||
मी माझ्या इष्ट देवाला स्मरूण केलेली हि प्रासादिक अंभगवाणी आहे यात शेवटी अंभगात आपन आपले नाव घालून
कालवुनी विष |
केला अमृताचा नाश ||
   असे करणारेची अभ्याग्याची बुद्धी असते
अरे स्वतःचे नाक कापुन कोणी सोन्याचे अलंकार घालते का? अशी वासना ठेवणार्यांना कशी ब्रम्हंस्थिती प्राप्त होईल हे एखाद्या वांझ स्त्रीने चिध्यां घालुन पोट वाढवत गह्रवार लक्षण मिरवल्या सारखे आहे कधि तरी हे असत्या उघड़किस येईलच ना? संताचा अवतार यासाठीच असतो
हा तो निवाड़्याचा ठाव |
खरा खोटा निवड़े भाव ||
गुण अवगुण निवाड़ा |
म्हैस म्हैस रेड़ा रेड़ा ||
मी माझ्या पाड़ुरंगाच वर्णन केलेले नाही तर
तुका म्हणे मज बोलवीतो देव
एखादी साळुंकी जरी मंजुळ वाणी बोलत असली तरी तिला
शिकवीता धनी वेगळाची
माझी सेवा तर पतिव्रता स्री प्रमाणे पाड़ुरंगाला स्मरूण असते
नमितो या देवा |
माझी ऐके ठायी सेवा ||
  माझ्या वाणीला जनी जनार्दनाची साक्ष आहे
बाबांनो हा तुमचा असा भेसळ केलेला माल जेथे विकेल तेथे जाऊन विका
विकाल तेथे विका |
माती नाव ठेवुनी बुका ||
सकंलण संदर्भ-
मागचे व पुढचे अनेक पान फाटलेल्या ग्रंथातुन

।। जय जय मुक्ताई ||
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

Sunday, 25 September 2016

इतुले करी देवा ऐके हे मात......

🌺|| श्री विठ्ठल ||🌺

इतुले करी देवा ऐके हे मात......

    भगवंत हा सर्वांच्या ह्रदयांत आहे पण आपले ह्रदयच दुसरीकडे असते,
काहींचे ह्रदय संपत्तीत,
काहींचे सत्तेत,
काहींचे बायकामुलांत,
काहींचे राजकारणात,
प्रतीष्ठेमध्ये गुंतलेले असते.
 पण आत असणाऱ्या देवाकडे कोणाचे लक्ष नसते. हे ह्रदय एकदा का देवाकडे वळविले तर ताबडतोब देवाची प्राप्ती होते, पन हे एवढे सोपे नाही,जगद्गुरू श्री संत तुकोबाराय म्हणतात की,

तुका म्हणे आतां |
अवघी तोडीं माझी चिंता |
येऊनि पंढरीनाथा |
वास करी ह्रदयी ||

    हे पंढरीनाथा, आता माझ्या ठिकाणची सर्व काळजी दुर करुन तुम्ही माझ्या ह्रदयांत वास्तव्य करावे. व एकदा का भगवंत ह्रदयांत आले की मग दिवस असो वा रात्र तोच आपनास दिसतो.

आणि जागता जंव असिजे |
तंव जेणे ध्यानें भावना भाविजे |
डोळा लागत खेवो देखिजे |
तेचि स्वप्नी ||

    संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की, मनुष्य जागा असतां त्याच्या मनांत ज्या कल्पना येतात, त्याच कल्पना डोळा लागल्यावर स्वप्नांत पन दिसु लागतात. म्हणुनच तुकोबाराय भगवंताला विनवणी करतात,

इतुले करी देवा ऐके हे मात |
ह्रदयी पंढरीनाथ दिवसरात्री ||

जय जय मुक्ताई 👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

बोलविले बोल पांडुरंगे......

🌺|| श्री विठ्ठल ||🌺

बोलविले बोल पांडुरंगे......

    जगद्गुरू श्री संत तुकोबारायांनी स्वतःच त्यांच्या चरित्राचा पूर्वार्ध सांगीतला आहे. इतरांनी दिलेल्या हकीकतीपेक्षा तुकोबारायांनी स्वतः एकदा संतांना जी आपली हकीकत सांगीतली ती आपण त्यांच्या अभंगातुन पाहुया ,

याति शूद्र वैश्य केला वेवसाव |
आदि तो हा देव कुळपूज्य ||
नये बोलों परि पाळिलें वचन |
केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ||
संवसारें जालों अतिदुःखें दुखी |
मायबाप सेखीं क्रमिलिया ||
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान |
स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ||
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें |
वेवसाय देख तुटी येतां ||
देवाचें देऊळ होतें तें भंगलें |
चित्तासी जें आलें करावेंसें ||
आरंभीं कीर्तन करीं एकादशी |
नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ||
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें |
विश्वासें आदरें करोनियां ||
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद |
भावें चित्त शुद्ध करोनियां ||
संताचें सेविलें तीर्थ पायवणी |
लाज नाहीं मनीं येऊं दिली ||
ठाकला तो कांहीं केला उपकार |
केलें हें शरीर कष्टवूनी ||
वचन मानिलें नाहीं सुह्रदांचें |
समूळ प्रपंचें वीट आला ||
सत्य असत्यासी मन केलें ग्वाही |
मानियेलें नाहीं बहुमतां ||
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश |
धरिला विश्वास दृढ नामीं ||
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ती |
पाय धरिले चित्तीं विठोबाचे ||
निषेधाचा कांहीं पडिला आघात |
तेणें मध्यें चित्त दुखविलें ||
बुडविल्या वह्या बैसलों धरणें |
केलें नारायणें समाधान ||
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार |
होइल उशीर आतां पुरे ||
आतां आहे तैसा दिसतो विचार |
पुढील प्रकार देव जाणे ||
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा |
कृपावंत ऐसा कळों आलें ||
तुका ह्मणे माझें सर्व भांडवल |
बोलविले बोल पांडुरंगें ||

धन्य तुकोबा समर्थ.....
जय जय मुक्ताई 👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/