आत्मज्ञाने चोखङी ! संत माझीच गा रूपङी !
सर्व संत हे त्रिकालदर्शी असतात. ते पुर्ण बोधावर असतात. ते अमुर्तालाच मुर्तिरूपात समदृष्टीने पहातात. पापपुण्याची व्याखा तर कुठेही समानच आढळते. कुणी त्याला दोजख म्हणतात तर कुणी त्याला हेल म्हणतात. इथ ऐक गोष्ट समान आहे ति म्हणजे काळतत्व. तो काळ इतका बलवत्तर आहे
कि त्याच्यापुढे कुणीच टिकला नाही.
आजवर
येथे नाही उरो आले अवतार !
येर ते पामर जिव किती !!
प्रत्येक अनुयायींमध्ये याच काळाची शिकवन देऊन सावध केले जाते, कुणी याला खौफ किंवा ङर म्हणतील, कुणी याला आकाशाचा बापही म्हणतील,
पण सार शेवटी ऐकच
आयुष्य खातो काळ सावधान !!
जिवनात ऐकच गोष्ट महत्वाची दिसली चमत्कार करणार्या पेक्षा काळाच अंतीम सत्य सांगणाऱ्या संताची कास धरूया, म्हणजे आत्म बोधाचाही विसर पङनार नाही, कारण त्यांच्या मार्गावर चालताना काहीच कराव लागत नाही.
जगा काळ खाय !
आम्ही माथा दिला पाय !!
अशा संत महात्म्यांचे आपन अनूयायीच ना? मग चला, ज्यांनी स्वतः काळावरच विजय मिळावला आहे त्याच मार्गाने
पुढे गेले त्याचा शोधित मारग !
चला जाऊ माग घेत आम्ही !!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
No comments:
Post a Comment