˙˙जय मुक्ताई ..

Monday, 2 October 2017

साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

     हे गीत कानावर पडले की  हातात काठी,डोळ्यांवर चष्मा,धोतर घातलेली,त्याच्यावर लटकणारे घड्याळ डोक्यावर एकही केस नसणारी व्यक्ती नजरेसमोर येते ती म्हणजे अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी उर्फ बापूजी.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा थोर नेत्यांमधे महात्मा गांधीजी यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.ब्रिटिश सरकारविरोधात प्रत्येक भारतीयाने आपआपल्या  पद्धतीने मार्ग स्वीकारला असेल पण या साबरमतीच्या संताने ना शस्त्र हाती घेतले ना शब्द अस्त्र हाती घेतले. निव्वळ सत्याग्रहाच्या बळावर इंग्रजांना वठणीवर आणले.त्यासाठीच त्यांनी समाजात जनजागृतीनिर्माण केली त्यात देशाभिमान आणि त्याग यांना अनन्यसाधारण महत्व होते.याकामी स्वतःचे जीवन तसे घडविले.भगवद्गीतेतला निष्काम कर्मयोग त्यांनी स्वीकारला.भगवद्गीता ही त्यांची सांयसंध्या प्रार्थना होती. २ अॉक्टोबर १८६९ मध्ये पोरबंदर येथे  त्यांचा जन्म झाला.त्यांच्या लहाणपणीच्या कथातर मोठया विलक्षण आहेत.
सत्य
   गांधीजीचे सत्यावर लहानपणापासून प्रेम होते.वाईट संगतीत जाण्यामुळे लहानपणी विडी पिण्याची गोष्ट स्वतः त्यांनी लिहिली आहे.त्यासाठी चोरी करावी लागली असही त्यांनी नमूद केल आहे.शेवटी वडिलांसमोर बोलण्याची हिमंत नव्हती म्हणून चिठ्ठीतून झालेली चूक सांगितली वडिलांनी आपल्या या सत्यवादी मुलाला माफ करून हृदयाशी धरले. या मागचे कारण म्हणजे आई पुतळाबाई यांचे संस्कार लहानपणापासूनच त्यांना भक्त प्रल्हाद आणि राजा हरिश्चंद्र या दोन सत्याग्रहींचा कथा खूप प्रिय होत्या.कारण ज्याला स्वतःला सत्य प्रिय आहे त्याला सत्यवादींच्या कथा प्रिय असणारच.याचाच आदर्श ब्रिटीश सरकारशी सत्याग्रह म्हणून पुढे आला. वैष्णव आणि गांधीजी अनेकांना आश्चर्य वाटेल पण गांधीजी म्हणायचे माझ्या,मनाने मी वैष्णवच आहे.संत नरसैय्या वैष्णवांचे लक्षण दाखवून गेला,आहे त्या वैष्णवाला मी ओळखतो आणि तसा वैष्णव होण्याचा प्रयत्न करीत आहे.
वैष्णव जन तो तेने कहीऐ जे पीड पराई जाणे रे
  त्यांच आवडत भजन त्याच बरोबर
रघुपति राघव राजराम पतित पावन सिताराम
हे तर सर्वांच्या मुखात असते.स्वःतची बहुतांशी कर्मे बापूजी स्वतःच करत इतराकडून सेवा करून घेणे त्यांना पसंत नव्हते.वारकऱ्यांच्या सहित इतरही लोकांच्या मस्तकावर दिसणारी सफेद टोपी ही बापूजींची देणगी आहे.तिलाच आपण गांधी टोपी असं म्हणतो.गांधीजींचा इतिहास हा आजच्या समाजासमोर जसा मांडला जातो तो कितीतरी चुकीचा आहे.सत्याग्रही गांधीजींच्या विचारात केवळ माणुसकी दिलेला शब्द पाळणे,आहिंसेचा लढा यांना महत्व होते.त्यांचे हे विचार काहींना पटत नव्हते देशाच्या फाळणीला गांधीजीचे हे विचारच कारणीभूत आहेत असा वहीम आसलेल्यांनीच वैचारीक संघर्षातून ३० जानेवरी १९४८ ला हत्या केली.महात्मा गांधीजींचे कट्टर,अनुयायी असणारे आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या उपदेशाचे आणि सत्याग्रही व्रताचे असे सूत्र तयार केले आहे.
अहिंसा-सत्य,अस्तेय,ब्रम्हचर्य,असंग्रह,शरीरश्रम,स्वदेशी,भयवर्धन,सर्वधर्मी,समानत्व  या सुत्राचा जर बारकाईने विचार केला तर महात्मा गांधीजी यांनी जीवन कसे व्यतीत केले ते समजून येईल.असो आज बापूजींची जयंती त्यानिमित्ताने आपल्या "चैतन्याचा जिव्हाळा" या पेजने या थोर आणि महान नेत्याविषयी केलेला हा छोटासा शब्दप्रपंच.
सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सर्वसामान्यांना स्वातंत्र्य लढ्याशी जोडणाऱ्या थोर महात्म्यास  आपल्या पेजकडून विनम्र अभिवादन!💐💐💐
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment