˙˙जय मुक्ताई ..

Monday, 2 October 2017

आंम्हा नारायण तैशापरी

🌺|| श्री विठ्ठल ||🌺

आंम्हा नारायण तैशापरी......

   एका राजाच्या दरबारात एक अतिशय विद्वान शास्त्रीबुवा होते. ते जेव्हा दरबारात यायचे तेव्हा राजा एकसारखा टक लावून पहात असे. शुभ्र रेशमी धोतर, तसाच लांब अंगरखा, जरी काठी उपरणे, हातात चांदीची काठी, गळ्यात स्पटीकाची माळ, कानात कुड़ंले व मस्तकावर विविध रंगाची रेशमी सुताची पगडी, असा त्यांचा थाट.

    यात विशेषता म्हणजे राजा शास्त्रीबुवाच्या या पगड़ीवरच भाळला होता. एक दिवस राजाने समय साधुन शास्त्रीबुवांना विचारलेच
"शास्त्रीजी आपन जी पगड़ी परिधान करता ती आपन कुठल्या बाजारातुन घेतली आहे?
आपन माझ्यासाठी एक आणुन द्याल का?"
शास्त्रीजी राजाला म्हणाले,
"महाराज ही पगडी मी विकत घेतली नसुन माझ्या पत्नीने तयार केली आहे."
यावर राजा म्हणाला, तुमची हरकत नसेल तर एक पगड़ी माझ्यासाठी तयार करून आणुन द्याल का? पगडी बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी पुरवतो
शास्त्रीजीनी होकार दिला, सर्व साहित्य घेऊन शास्त्रीजी घरी आले, पत्नीला ते साहित्य देऊन एक पगड़ी राजेसाहेबासाठी बनविण्यास सागितंले काही दिवसात पगड़ी तयार झाली. राजाने पगड़ी ड़ोक्यावर ठेवुन आरशासमोर उभे राहुन बघितले व म्हणाले
शास्त्रीजी पगड़ी अतिशय छान आहे परंतु तुमच्या पगड़ी सारखी झाली नाही...
   शास्त्रीजीने पत्नीला दुसरी पगडी बनविण्यासाठी सांगितले शास्त्रीजीच्या पत्नीने अनेक पगड़ी बनविल्या परंतु प्रत्येक वेळेस राजाची तिचे प्रतिक्रिया येत होती. राजा म्हणाला सर्व साहित्य तर तेच आहे व पगड़ी बनविणारी स्रीही तिच आहे, आणि
बनविणारे हातही तेच आहेत मग असे का होते??? शेवटी राजाने शास्त्रीनां आपल्या पत्नीला दरबारात हजर रहाण्यास सांगितले. राजाने शास्त्रीजीच्या पत्नीला विचारले पगड़ी बनविण्यासाठी लागणारे साहित्यही तेच आहे. व बनविणारे हात ही तेच आहेत
मग शास्त्रीबुवा सारखी पगड़ी का तयार होत नाही मग??? यावर शास्त्रीजीची पत्नी राजाला म्हणाली राजेसाहेब रागाऊ नका मी एक पतिव्रता स्री आहे व माझ्या पतिची पगड़ी बनविताना मी माझ्या ह्रदयातील प्रेमही त्या पगड़ीत ओतलय ते मी तुमची पगडी बनविताना परपुरूषासाठी कुठून आणू...
पतिव्रतेचें हृदय जैसें ।
पतिवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसें ।
सुभटांसी ॥
  कारण, प्रेम हे अनन्य असते एकालंबनात्मक असते, तेथे व्यभिचार रूपी भावही खपत नाही. पतिव्रता स्रीचे हे शब्द ऐकून राजा निरूत्तर झाला. भक्तिमार्गातही हिच एकनिष्ठ प्रेमभक्ती संतमहात्मांनी सांगितली आहे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत याच एकविध भक्तीच वर्णन करतात
परी तेची भक्ती ऐसी |
पर्जन्याची सुटिका जैसी |
धरावाचुनी अनारिसी |
गतिच नेणे ||
   जगद्गूरू तुकाेबाराय हि अंभगात म्हणतात
एक धरिला चित्ती |
आम्ही रखुमाईचा पती ||
अथवा
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण |
आम्हा नारायण तैशापरी ||
   हे सुद्धा फक्त संतानीच म्हणाव माझ्यासारख्या दररोज नवीन देव बदलणाऱ्यांना तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात
ऐसा अखंड भजन करी |
उगा नोहे क्षणभरी |
अवघेन गांवद्वारी |
अहेव जैसी ||

जय जय मुक्ताई 👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment