🌺।। श्री विठ्ठल ।।🌺
विवेकी तये ठायीं न गुंतेची
या जगात प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत आहे. म्हणून आपण या नाशिवंत जगात मनाने गुंतून पडू नये . श्री संत चोखोबाराय म्हणतात,
फुलाचे अंगी सुवास असे ।
फूल वाळलिया सुवास नासे ॥
मृतिकेचे घट केले नानापरी ।
नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥
विराली मृत्तिका फुटलें घट ।
प्राणी कां फुकट शोक करी ॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं ।
विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥
फुलाच्या अंगी भलेही सुवास असो, फूल वाळल्यावर तो सुवास नासतो. त्याचप्रमाणे जगातील प्रयेक गोष्टीत कितीही सौदर्य साठलेले असू दे, ते कधी ना कधी तरी नष्ट होत असते .
ज्याप्रमाणे मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू केल्या जातात. त्यांना रांजण, घागरी, माथण घागरी अशी विविध नावे दिली जातात. पण सर्व वस्तू शेवटी मातीच्याच असतात . कधी ना कधीतरी ते फुटू शकतात.
माणसांचे पन तसेच असते. माणसे ही विविध प्रकारची असतात. त्यांना वेगवेगळी नावे असतात. पण सारी माणसे नाशिवंतच असतात. कधी ना कधी तरी त्यांचा शेवट होणारच असतो. कोणताही माणूस भले कितीही श्रीमंत असो, विद्वान असो, उच्च अधिकारी असो, त्याचा शेवट हा होणारच आहे .
आपल्याला कोणाच्याही मृत्युचे मोठे दुःख होते. पण मरण फार दुःख करण्यासारखी गोष्ट नाही. एखादी मातीची वस्तू फुटण्याचे कोणी दुःख करत बसत नाही. मग माणसाच्या मरणाचे तरी दुःख का करत बसावे?
मानवी जीवनात सुख हे मृगजळासारखे असते. मृगजळाच्या पाठीमागे कितीही धावले तरी ते हाती लागत नाही. मानवी जीवनातील सुखांचाही कितीही पाठलाग केला तरी ती सुखे कायमची हाती लागणार नाहीत. हाती लागलेली सुखे किती काळ टिकून राहतील, याचा भरवसा नसतो.
अशा या जीवनात माणसाने मनाने फार गुंतू नये, असे चोखाबारायांना वाटते. अमुक एक व्यक्ती किंवा अमुक एक गोष्ट मला कायमचे सुख देईल, असे गृहित धरू नये. या जगात शाश्वत सुख देणारा फक्त परमात्माच असतो. म्हणून फक्त परमात्म्याकडूनच शाश्वत आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे . जे जगच मुळात अशाश्वत आहे , त्याच्याकडून शाश्वत आनंदाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. म्हणून तशा प्रकारची अपेक्षा करू नये, जो फक्त परमात्म्याकडूनच शाश्वत आनंदाची अपेक्षा करेल, असा माणूस हा आपणच आहोत व तसे विवेकी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
संग्रहीत_चिंतन
जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment