˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 10 October 2017

विश्वात्मक मैत्री

शके बाराशे बारोत्तरे |
टिका केली ज्ञानेश्वरे ||
     माऊली ज्ञानोबारायांच्या अगोदर हजारो ग्रंथकर्ते होऊन गेले परंतु,
व्यासाचा मागोवा घेत |
भाष्यकाराते वाट पुसतू ||
किंवा
वेदमार्गे मुनी गेले तेची मार्गे चालिलो |
    म्हणणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्या दिवशी पसायदान लिहिले तो खरा जागतिक मैत्री दिवस..
      साऱ्या विश्वासाठी विश्वबंधुत्वाच  पसायदान मागणाऱ्या ह्या विश्वालाच मैत्री साठी साक्षात साकङ घातल, ऐका आकाश गंगेत एक अब्ज सुर्यमाला आहेत, त्यातली आपली एक सुर्यमाला, त्यात पृथ्वी पुन्हा त्यात भारत, पुन्हा आपल राज्य, जिल्हा, तालुका, गाव, आपल घर व आपन किती व्यापकता आहे विचाराची, त्या जगतात सूर्यदेवाचे पन एक नाव मित्र आहे, पृथ्विचा गुण आहे क्षमा आणि सुर्य तर तळपत असतो, तरीही अशा अनोख्या पृथ्वी-सूर्यातलं हे मैत्रीचं नात ही माऊली ज्ञानोबारायांची संकल्पना आहे. विश्वाला सुखी करण्याची. भगवंताकङे केलेली मागणी पुर्ण झालेवर माऊली म्हणतात,
ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा |
पादपद्मी ठेवा निरतंर ||
 आणी हाच आदर्श ठेवणारे आपनही त्याच ज्ञानोबा तुकोबाचे ज्ञान वशं आहोत ना? मग आपल्यातली मैत्रीही अशीच आकाशाला गवसणी घालणारी व्यापक होईल ना?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Sunday, 8 October 2017

🌺।। श्री विठ्ठल ।।🌺

विवेकी तये ठायीं न गुंतेची

     या जगात प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत आहे. म्हणून आपण या नाशिवंत जगात मनाने गुंतून पडू नये . श्री संत चोखोबाराय म्हणतात,
फुलाचे अंगी सुवास असे ।
फूल वाळलिया सुवास नासे ॥
मृतिकेचे घट केले नानापरी ।
नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥
विराली मृत्तिका फुटलें घट ।
प्राणी कां फुकट शोक करी ॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं ।
विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥
   फुलाच्या अंगी भलेही सुवास असो, फूल वाळल्यावर तो सुवास नासतो. त्याचप्रमाणे जगातील प्रयेक गोष्टीत कितीही सौदर्य साठलेले असू दे, ते कधी ना कधी तरी नष्ट होत असते .
     ज्याप्रमाणे मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू केल्या जातात. त्यांना रांजण, घागरी, माथण घागरी अशी विविध नावे दिली जातात. पण सर्व वस्तू शेवटी मातीच्याच असतात . कधी ना कधीतरी ते फुटू शकतात.
    माणसांचे पन तसेच असते. माणसे ही विविध प्रकारची असतात. त्यांना वेगवेगळी नावे असतात. पण सारी माणसे नाशिवंतच असतात. कधी ना कधी तरी त्यांचा शेवट होणारच असतो. कोणताही माणूस भले कितीही श्रीमंत असो, विद्वान असो, उच्च अधिकारी असो, त्याचा शेवट हा होणारच आहे .
  आपल्याला कोणाच्याही मृत्युचे मोठे दुःख होते. पण मरण फार दुःख करण्यासारखी गोष्ट नाही. एखादी मातीची वस्तू फुटण्याचे कोणी दुःख करत बसत नाही. मग माणसाच्या मरणाचे तरी दुःख का करत बसावे?
      मानवी जीवनात सुख हे मृगजळासारखे असते. मृगजळाच्या पाठीमागे कितीही धावले तरी ते हाती लागत नाही. मानवी जीवनातील सुखांचाही कितीही पाठलाग केला तरी ती सुखे कायमची हाती लागणार नाहीत. हाती लागलेली सुखे किती काळ टिकून राहतील, याचा भरवसा नसतो.
    अशा या जीवनात माणसाने मनाने फार गुंतू नये, असे चोखाबारायांना वाटते. अमुक एक व्यक्ती किंवा अमुक एक गोष्ट मला कायमचे सुख देईल, असे गृहित धरू नये. या जगात शाश्वत सुख देणारा फक्त परमात्माच असतो. म्हणून फक्त परमात्म्याकडूनच शाश्वत आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे . जे जगच मुळात अशाश्वत आहे , त्याच्याकडून शाश्वत आनंदाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. म्हणून तशा प्रकारची अपेक्षा करू नये,  जो फक्त परमात्म्याकडूनच शाश्वत आनंदाची अपेक्षा करेल, असा माणूस हा आपणच आहोत व तसे विवेकी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

संग्रहीत_चिंतन
जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

आता जागा रे भाईनों जागा


आत्मज्ञाने चोखङी ! संत माझीच गा रूपङी !
   सर्व संत हे त्रिकालदर्शी असतात. ते पुर्ण बोधावर असतात. ते अमुर्तालाच मुर्तिरूपात समदृष्टीने पहातात. पापपुण्याची व्याखा तर कुठेही समानच आढळते. कुणी त्याला दोजख म्हणतात तर कुणी त्याला हेल म्हणतात. इथ ऐक गोष्ट समान आहे ति म्हणजे काळतत्व. तो काळ इतका बलवत्तर आहे
कि त्याच्यापुढे कुणीच टिकला नाही.
आजवर
येथे नाही उरो आले अवतार !
येर ते पामर जिव किती !!
  प्रत्येक अनुयायींमध्ये याच काळाची शिकवन देऊन सावध केले जाते, कुणी याला खौफ किंवा ङर म्हणतील, कुणी याला आकाशाचा बापही म्हणतील,
पण सार शेवटी ऐकच
आयुष्य खातो काळ सावधान !!
   जिवनात ऐकच गोष्ट महत्वाची दिसली चमत्कार करणार्‍या पेक्षा काळाच अंतीम सत्य सांगणाऱ्या संताची कास धरूया, म्हणजे आत्म बोधाचाही विसर पङनार नाही, कारण त्यांच्या मार्गावर चालताना काहीच कराव लागत नाही.
जगा काळ खाय !
आम्ही माथा दिला पाय !!
अशा संत महात्म्यांचे आपन अनूयायीच ना? मग चला, ज्यांनी स्वतः काळावरच विजय मिळावला आहे त्याच मार्गाने
पुढे गेले त्याचा शोधित मारग !
चला जाऊ माग घेत आम्ही !!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

लागो आगी नावा

लागो आगी नावा

   शरीराचा जन्म होतो म्हणून त्याला मरावच लागत.
कारण हा सृष्टीचा नियमच आहे.
उपजे ते नाशे !
नाशीले ते पुनरपी दिसे !
हे घटिका यंत्र जैसे !
परीभ्रमे गा !!
  जो जन्माला आला तो मरनारच.
जो खाटावर आला तो कधीतरी ताटीवर जाणारच.....
आजा मेला पनजा मेला बाप म्हसना गेला !
देखत देखत नातू पनतू तोही तैसा झाला !!
येथ नाही उरो आले अवतार !
येर ते पामर जिव कीती !!
   मग रङत बसण्या पेक्षा आनंदाने सृष्टीच्या परीवर्तनाची वाट पहावी. आत्मा बदलत नाही, मग चिंता कशाला? उगाच शरीराची उत्पती समजून स्वभाव जानून घेतला पाहिजे.
शरीर जर नाशिवंत स्वभावे मग त्याचे किती लाङ पुरवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
नौ भी मर गये दस भी मर गये मर गये जिन्दा जोगी
सगळेच मरनारच आहे,
उदंङची झाले जन्मोनीया मेले !
होउनीया गेले रावरंक !!
त्याचे नाम कोणी नेघे चराचरी
मग आपल्या नावाचाही अट्टाहास कशासाठी.....
तुकाराम महाराज म्हणतात,
क्षण एक तोही नाही विसावा !
लक्ष चौर्याशी घेतल्या धावा !
भोवङंती पाठी लागल्या हावा !
लागो आगी नावा माझ्या मिपना !!
अशा नाशिवंत शरिराकङुनच आनंदाची अपेक्षा करनच मुळात हास्यास्पद आहे. या नाशिवंताचा कशाला अभिमान पाहिजे उगाचच
यापेक्षा तुकोबाराय म्हणतात,
निरंजनी आम्ही बाधियंले घर !
निराकारी निरंतर राहीलोसे !!
  उपदेशापेक्षा आपन स्वताच उपदेशीत होन कधीही चांगले. निराकार भक्ती सोपी नाही पण अवघङही तितकी नाही. साधुसंत तिथेच तर वास्तव करतात म्हणून साधक जिवनात हेच तर अंतिम ध्येय असते.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Monday, 2 October 2017

साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

     हे गीत कानावर पडले की  हातात काठी,डोळ्यांवर चष्मा,धोतर घातलेली,त्याच्यावर लटकणारे घड्याळ डोक्यावर एकही केस नसणारी व्यक्ती नजरेसमोर येते ती म्हणजे अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी उर्फ बापूजी.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा थोर नेत्यांमधे महात्मा गांधीजी यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.ब्रिटिश सरकारविरोधात प्रत्येक भारतीयाने आपआपल्या  पद्धतीने मार्ग स्वीकारला असेल पण या साबरमतीच्या संताने ना शस्त्र हाती घेतले ना शब्द अस्त्र हाती घेतले. निव्वळ सत्याग्रहाच्या बळावर इंग्रजांना वठणीवर आणले.त्यासाठीच त्यांनी समाजात जनजागृतीनिर्माण केली त्यात देशाभिमान आणि त्याग यांना अनन्यसाधारण महत्व होते.याकामी स्वतःचे जीवन तसे घडविले.भगवद्गीतेतला निष्काम कर्मयोग त्यांनी स्वीकारला.भगवद्गीता ही त्यांची सांयसंध्या प्रार्थना होती. २ अॉक्टोबर १८६९ मध्ये पोरबंदर येथे  त्यांचा जन्म झाला.त्यांच्या लहाणपणीच्या कथातर मोठया विलक्षण आहेत.
सत्य
   गांधीजीचे सत्यावर लहानपणापासून प्रेम होते.वाईट संगतीत जाण्यामुळे लहानपणी विडी पिण्याची गोष्ट स्वतः त्यांनी लिहिली आहे.त्यासाठी चोरी करावी लागली असही त्यांनी नमूद केल आहे.शेवटी वडिलांसमोर बोलण्याची हिमंत नव्हती म्हणून चिठ्ठीतून झालेली चूक सांगितली वडिलांनी आपल्या या सत्यवादी मुलाला माफ करून हृदयाशी धरले. या मागचे कारण म्हणजे आई पुतळाबाई यांचे संस्कार लहानपणापासूनच त्यांना भक्त प्रल्हाद आणि राजा हरिश्चंद्र या दोन सत्याग्रहींचा कथा खूप प्रिय होत्या.कारण ज्याला स्वतःला सत्य प्रिय आहे त्याला सत्यवादींच्या कथा प्रिय असणारच.याचाच आदर्श ब्रिटीश सरकारशी सत्याग्रह म्हणून पुढे आला. वैष्णव आणि गांधीजी अनेकांना आश्चर्य वाटेल पण गांधीजी म्हणायचे माझ्या,मनाने मी वैष्णवच आहे.संत नरसैय्या वैष्णवांचे लक्षण दाखवून गेला,आहे त्या वैष्णवाला मी ओळखतो आणि तसा वैष्णव होण्याचा प्रयत्न करीत आहे.
वैष्णव जन तो तेने कहीऐ जे पीड पराई जाणे रे
  त्यांच आवडत भजन त्याच बरोबर
रघुपति राघव राजराम पतित पावन सिताराम
हे तर सर्वांच्या मुखात असते.स्वःतची बहुतांशी कर्मे बापूजी स्वतःच करत इतराकडून सेवा करून घेणे त्यांना पसंत नव्हते.वारकऱ्यांच्या सहित इतरही लोकांच्या मस्तकावर दिसणारी सफेद टोपी ही बापूजींची देणगी आहे.तिलाच आपण गांधी टोपी असं म्हणतो.गांधीजींचा इतिहास हा आजच्या समाजासमोर जसा मांडला जातो तो कितीतरी चुकीचा आहे.सत्याग्रही गांधीजींच्या विचारात केवळ माणुसकी दिलेला शब्द पाळणे,आहिंसेचा लढा यांना महत्व होते.त्यांचे हे विचार काहींना पटत नव्हते देशाच्या फाळणीला गांधीजीचे हे विचारच कारणीभूत आहेत असा वहीम आसलेल्यांनीच वैचारीक संघर्षातून ३० जानेवरी १९४८ ला हत्या केली.महात्मा गांधीजींचे कट्टर,अनुयायी असणारे आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या उपदेशाचे आणि सत्याग्रही व्रताचे असे सूत्र तयार केले आहे.
अहिंसा-सत्य,अस्तेय,ब्रम्हचर्य,असंग्रह,शरीरश्रम,स्वदेशी,भयवर्धन,सर्वधर्मी,समानत्व  या सुत्राचा जर बारकाईने विचार केला तर महात्मा गांधीजी यांनी जीवन कसे व्यतीत केले ते समजून येईल.असो आज बापूजींची जयंती त्यानिमित्ताने आपल्या "चैतन्याचा जिव्हाळा" या पेजने या थोर आणि महान नेत्याविषयी केलेला हा छोटासा शब्दप्रपंच.
सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सर्वसामान्यांना स्वातंत्र्य लढ्याशी जोडणाऱ्या थोर महात्म्यास  आपल्या पेजकडून विनम्र अभिवादन!💐💐💐
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

आंम्हा नारायण तैशापरी

🌺|| श्री विठ्ठल ||🌺

आंम्हा नारायण तैशापरी......

   एका राजाच्या दरबारात एक अतिशय विद्वान शास्त्रीबुवा होते. ते जेव्हा दरबारात यायचे तेव्हा राजा एकसारखा टक लावून पहात असे. शुभ्र रेशमी धोतर, तसाच लांब अंगरखा, जरी काठी उपरणे, हातात चांदीची काठी, गळ्यात स्पटीकाची माळ, कानात कुड़ंले व मस्तकावर विविध रंगाची रेशमी सुताची पगडी, असा त्यांचा थाट.

    यात विशेषता म्हणजे राजा शास्त्रीबुवाच्या या पगड़ीवरच भाळला होता. एक दिवस राजाने समय साधुन शास्त्रीबुवांना विचारलेच
"शास्त्रीजी आपन जी पगड़ी परिधान करता ती आपन कुठल्या बाजारातुन घेतली आहे?
आपन माझ्यासाठी एक आणुन द्याल का?"
शास्त्रीजी राजाला म्हणाले,
"महाराज ही पगडी मी विकत घेतली नसुन माझ्या पत्नीने तयार केली आहे."
यावर राजा म्हणाला, तुमची हरकत नसेल तर एक पगड़ी माझ्यासाठी तयार करून आणुन द्याल का? पगडी बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी पुरवतो
शास्त्रीजीनी होकार दिला, सर्व साहित्य घेऊन शास्त्रीजी घरी आले, पत्नीला ते साहित्य देऊन एक पगड़ी राजेसाहेबासाठी बनविण्यास सागितंले काही दिवसात पगड़ी तयार झाली. राजाने पगड़ी ड़ोक्यावर ठेवुन आरशासमोर उभे राहुन बघितले व म्हणाले
शास्त्रीजी पगड़ी अतिशय छान आहे परंतु तुमच्या पगड़ी सारखी झाली नाही...
   शास्त्रीजीने पत्नीला दुसरी पगडी बनविण्यासाठी सांगितले शास्त्रीजीच्या पत्नीने अनेक पगड़ी बनविल्या परंतु प्रत्येक वेळेस राजाची तिचे प्रतिक्रिया येत होती. राजा म्हणाला सर्व साहित्य तर तेच आहे व पगड़ी बनविणारी स्रीही तिच आहे, आणि
बनविणारे हातही तेच आहेत मग असे का होते??? शेवटी राजाने शास्त्रीनां आपल्या पत्नीला दरबारात हजर रहाण्यास सांगितले. राजाने शास्त्रीजीच्या पत्नीला विचारले पगड़ी बनविण्यासाठी लागणारे साहित्यही तेच आहे. व बनविणारे हात ही तेच आहेत
मग शास्त्रीबुवा सारखी पगड़ी का तयार होत नाही मग??? यावर शास्त्रीजीची पत्नी राजाला म्हणाली राजेसाहेब रागाऊ नका मी एक पतिव्रता स्री आहे व माझ्या पतिची पगड़ी बनविताना मी माझ्या ह्रदयातील प्रेमही त्या पगड़ीत ओतलय ते मी तुमची पगडी बनविताना परपुरूषासाठी कुठून आणू...
पतिव्रतेचें हृदय जैसें ।
पतिवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसें ।
सुभटांसी ॥
  कारण, प्रेम हे अनन्य असते एकालंबनात्मक असते, तेथे व्यभिचार रूपी भावही खपत नाही. पतिव्रता स्रीचे हे शब्द ऐकून राजा निरूत्तर झाला. भक्तिमार्गातही हिच एकनिष्ठ प्रेमभक्ती संतमहात्मांनी सांगितली आहे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत याच एकविध भक्तीच वर्णन करतात
परी तेची भक्ती ऐसी |
पर्जन्याची सुटिका जैसी |
धरावाचुनी अनारिसी |
गतिच नेणे ||
   जगद्गूरू तुकाेबाराय हि अंभगात म्हणतात
एक धरिला चित्ती |
आम्ही रखुमाईचा पती ||
अथवा
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण |
आम्हा नारायण तैशापरी ||
   हे सुद्धा फक्त संतानीच म्हणाव माझ्यासारख्या दररोज नवीन देव बदलणाऱ्यांना तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात
ऐसा अखंड भजन करी |
उगा नोहे क्षणभरी |
अवघेन गांवद्वारी |
अहेव जैसी ||

जय जय मुक्ताई 👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Sunday, 1 October 2017

चक्रवर्ती करी

चक्रवर्ती करी
    मानवी मनाच्या विकासात भाषेच मोठ योगदान आहे. अनेक भाषाचं पिढानपिढ्या चालत आलेल ज्ञान सक्रंमीत करण्यासाठी भाषा हा राजमार्गाला जोङणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
    भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली.
ती पन एक विशिष्ट भाषेचा आधार घेऊनच
त्याच गीता ग्रंथावर टिका करताना विश्व माऊली ज्ञानोबारायांनी छप्पन भाषेचा गौरव केला.
अंतरीक साधनेने परिपूर्ण ठरलेले तुकोबाराय शब्दप्रभू ठरले. या सर्व ग्रंथाच्या जगतात श्री गीता व त्याच ग्रंथाचा अंलकार असलेली माय ज्ञानेश्वरी
तिच वैभव आगळे वेगळेच आहे .
    वेदाला तरी जातीपातीच बधंण आहे परंतू गीता ज्ञानेश्वरी ही सर्वासाठी आहे. ते गीतेच तत्वज्ञान जर समजून घेतल तर जिवनात पुन्हा दुःखच येनार नाहीत.
कदाचित सकंट येतील पन दुःखदायक मुळीच नसणार.
   ज्ञानेश्वरीच्या वाचनाने साधकाची बौधीक क्षमता वाढते. अशा गीताईच्या बोधाने,
तरी पुढील साधावया कार्यार्थ |
पुर्ण झाला पार्थ ||
   जाणते लोक कर्म सोडतच नाही कधी किंवा कर्मापासून दुर पन जात नाही. फळाची अपेक्षा न करता निष्काम कर्म करत असतात. अगदी लहान बाळाला सुद्धा आई शिकवत असते. कर्म करत जा.
गीता ज्ञानेश्वरीची अजुन एक दुसरी शिकवण आहे
अलिप्त रहा. निर अंहकारी रहा व ममत्वरहीत जिवन जगाव.
अलिप्त विटाळा तुका म्हणे
  अशी ही श्री गीता आणि ज्ञानेश्वरीचे आपन फक्त मनाने कानाने वाचेने सेवक होऊया मग,
 म्हणोनी मने काये वाचा |
जो सेवक होईल इयेचा |
तो स्वानंद साम्राज्याचा |
चक्रवर्ती करी ||
  अशी ही माय ज्ञानेश्वरी...
जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/