˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

दंड़कारण्य

दंड़कारण्य
महर्षी अगस्तीचे वास्तव्य दंडकारण्यातील एका आश्रमात होते.
तेथे एकदा श्रीराम प्रभु वनवासात आल्यावर त्यांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी विचारले,
"हे एवढे मोठे वन पशुपक्षीविरहित निर्जन, शून्य व भयंकर कसे बनले?''
या प्रश्‍नाचे उत्तर देताना अगस्तींनी दंडकारण्याची उत्पत्ती कथा सांगितली 
सत्ययुगात इक्ष्वाकू नावाचा धर्मपरायण राजा होता.
त्याने अनेक यज्ञ केले.
त्याच्या अनेक पुत्रांपैकी सर्वांत धाकटा हा शूर, विद्वान व गुणी होता.
राजाने त्याचे नाव दंड असे ठेवले होते.
विंध्य पर्वताच्या दोन शिखरांमध्ये मधुमत्त नावाचे नगर वसवून ते त्याला राहायला देण्यात आले. दंडाने पुष्कळ वर्षे तेथे धर्माने राज्य केले.
एकदा दंड भार्गव मुनींच्या म्हणजेच शुक्राचार्यांच्या आश्रमापाशी फिरत आले असता, त्यांची सुंदर कन्या अरजा त्याने पाहिली.
तिच्या रूपाने मोहित होऊन तो तिला बळजबरीने आपल्याबरोबर चलण्याचा आग्रह करू लागला. आपल्या पित्याची परवानगी घेऊन आपल्याला न्यावे, ही तिची विनवणी न ऐकताच राजाने तिच्यावर जबरदस्ती केली व तो निघून गेला.
शुक्राचार्य स्नान करून शिष्यांसह परत आल्यावर अरजाने रडतरडत ही हकिगत त्यांना सांगितली. अरजाची ती दीन अवस्था पाहून शुक्राचार्य क्रोधीत झाले व शिष्यांना म्हणाले, "तुम्ही सर्वांनी या राज्याच्या बाहेर जावे. धर्माविरुद्ध आचरण करणारा हा पापी राजा त्याचा देश, सेवक व सर्व संपत्तीसह नष्ट होईल. धुळीच्या वर्षावानं त्यांचं राज्य नाश पावेल."
अरजेला तेथेच ठेवून शुक्र आश्रमासाठी दुसरी जागा शोधण्यासाठी निघून गेले. 
त्यांच्या म्हणण्यानुसार दंडाचे राज्य एका आठवड्यात जळून खाक झाले. तेव्हापासून हे विंध्य पर्वत रांगातील हे ठिकाण दंडकारण्य म्हणून ओळखले जाऊ लागले

जय मुक्ताई

तारू भला पाड़ुरंग

तारू भला पाड़ुरंग
जुन्या काळात पढंरपुरात चंद्रभागेवर पुल नसल्याने पलिकडून येणारे वारकरी कार्तिकी वारीला येताना नावेतुन येत असत
भगवान पढंरीनाथाची एक भक्त गोमाई तिच्या घरापासून पढंरीपर्यंत पायी वारी करत आली
परंतु
तिच्याकड़े नावाड़्याला देण्यासाठी जवळ पैसे न्हवते
तरीही ती नावेत बसली असता त्या नावाड़्याने तिला पैसे नाहीत म्हणून नावेतुन ढकलून दिले
जगाचा आश्रय आता संपला होता
मन उतावीळ झाले होते ते पढंरीनाथाच्या दर्शनासाठी
हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करत गोमाई पढंरीच्या पैलतीराला दाखल झाली होती
भगवंताच्या भेटीला तिचे मन लाचांवले होते
शुद्ध प्रेम व निष्ठावंत भक्ती पाहून भगवंत तिथे गोमाई जवळ क्षणात प्रगट झाले
गोमाईचे फार मोठे तप न्हवते परंतु भगवंताच्या दर्शनाची व्याकुळता इतकी होती की क्षणार्धात तिचे व्याकुळ मन पाड़ुरंग परमात्माला चिटकले
तर
क्षणातच भगवान परमात्मा गोमाईचा शुद्ध भाव बघून चार भोपळ्याचा तारू घेऊन आले
भगवान म्हणतात
बाई गोमाई!
चल तुला मी पैलतीराला नेतो.
तेव्हा गोमाई म्हणाली

बाबा!
तुला देण्यासाठी माझ्याकड़े पैसे नाहीत.
भगवान म्हणाले
बाई!
ज्यांच्या जवळ काहीच नाही त्यांना पैलतीराला नेण्याचीच सेवा मी युगानुयुगे करतोय.
भगवान परमात्माने गोमाईला आपल्या तारूवर बसवीले व गोमाईचा पायही भिजु न देता पैलतीराला आणले
आता जिथे स्वतः
तारू भला पाड़ुरंग!पाय भिजो नेदी अंग!!
तिथे भक्त संसाररूपी भवनदीत ओला कसा होईल?
भगवान पढंरीश परमात्माने गोमाईला नुसते पैलतीराला नेऊन सोडले ते केवळ निष्ठावंत भावामुळेच
आजही भगवान परमात्माने आपल्यासाठीच
नाव चंद्रभागेच्या तिरी !उभी पुड़ंलीकाचे द्वारी!कट धरोनीया करी!उभा उभी पालवी!!
मग भक्ताला

भवसिधुंसी काय कोड़े!वाट दावी चाले पुढे!!
बघा जमले तर नक्कीच जा सर्वांनी कार्तिकीला पढंरीला
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

अधिक अक्षराने एका

अधिक अक्षराने एका
भिष्माचार्य जेंव्हा शरपजंरी पड़ले तेव्हा त्यानां विचारले
तुमची इच्छा काय?
तेव्हा ते म्हणाले
त्रिभुवन कमलं ,तमाल वर्ण म्हणजे निळा वर्ण ,चंद्र सुर्याला लाजवणारे ज्याचे तेज,पिताबंर नेसलेल्या व अर्जुनाचा मित्र माझ्या दृष्ठीसमोर रहावा
हि एकमेव इच्छा आहे
निळा हा शब्द वर्ण वाचक आहे
जगात तशा निळ्या रंगाच्या अनेक वस्तू आहेत
आकाशही निळे आहे
सागराचे पाणी ही निळे आहे
निळ हा एक गुण आहे
असा निळा रंग धारण केलेला परमात्मा विटेवर युगानुयुगे उभा आहे
तो निर्गुण, निराकार व निरूप असल्याने निलरूपाने भासतो
म्हणोनी या परमात्माला नीळा,सावळा ,काळा असे संबोधले जाते
कैसे निलोत्पलाते रावीत!आकाशाही रंग लाविता!तेजाची ओज दावीत!इद्रंनिळा!!
श्यामवर्ण,मेघवर्ण,कृष्णवर्ण या काळीयारूपासीच म्हटले जाते
असा हा गुण लावण्याची खाण असलेला परमात्मा पढंरीत म्हणजे भुवैकुंठात आपल्या भक्तांची वाट पहात उभा आहे

अधिक अक्षराने एका!भुवैकुंठ म्हणे तुका!!
आला कार्तिकीचा हाट
ज्यानां शक्य होईल त्यांनी जरूर जाव कार्तिक वारीला
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/