˙˙जय मुक्ताई ..

Friday, 3 November 2017

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण
    महाराष्ट्राच्या_मातीवर_समतेचे आणि ममतेचे जे संस्कार झाले ते वारकरी संप्रदायामुळे आणि पांडुरंग परमात्मा या महनीय दैवतामुळे.म्हणूनच आपण पहातो की,सामान्य माणूस खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन ज्ञानोबा-तुकाराम,विठोबा-रखुमाई आणि या विठ्ठलाचे अभंग गात गात शेकडो मैल जमीन पायी चालत आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येतो.आणि मनोमन सुखावून जातो. #आषाढी कार्तिकी विसरू नका मज।सांगतसे गुज पांडुरंग। असं स्वतः परमात्मा सांगतोय अस संतवचन आहे.असंख्य भक्तांच्या मानसिक सुखाचं हे माहेरघर आहे.वारकरी संप्रदाय हा समता विचारानं भरलेला आहे.संताच्या वाङमयात सुद्धा समतेच्या विचाराला प्राधान्य दिसून येते.एका अर्थान आपण असही म्हणू शकतो की वारकरी संप्रदाय हा समतेची मशाल हाती घेऊन अवघ्या विश्वाच्या अंधारलेल्या मनात प्रकाश पाडीत प्रवास करीत आहे.आणि याचा प्रत्यय हा आषाढी-कार्तिकीच्या वेळी भारतातल्या आणि भारताबाहेरूनही येणारी जी लोकगंगा चंद्रभागेला येऊन मिळते तेव्हा येतो.वारकरी पंथाच्या या महाद्वारातून कोणत्याही जातीचा आणि वर्णाचा भक्त पांडुरंगाची भेट घेऊ शकतो.वारकरी पथांची विचारसरणी विश्वाला महान शिकवण देणारी आहे. हिथे जातीपातीचा नाही तर भक्तीचा विचार होतो.माऊलींची सुंदर ओवी आहे,
म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण।

हे आघवेचि या अकारण।
एथ अर्जुना माझेपण।
सार्थक एक।
#जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment