˙˙जय मुक्ताई ..

Friday, 3 November 2017

जंतूनाम्_नरजन्म_दुर्लभमिदम्

जंतूनाम्_नरजन्म_दुर्लभमिदम्
श्रीविठ्ठल
जगतातील भगवंताची सर्वोत्कृष्ट निर्मिती जर काय असेल तर ती मानव.
आपल्याला मिळालेल अतीशय पवित्र अस मानवी जीवन हे अनेक जन्माच्या सुकृताचे फळ आहे.
अत्यंत दुर्लभ असा मानवजन्म मिळला हा कागताली न्याय आहे.
इतर प्राणी व मानव यात आहार, निद्रा, भय व मैथून आदी गुण समान आहेत
परंतू
पशू काय पाप पुण्य जाणती
यातुलनेत भगवंताने बुद्धी हा एक विशेष गुण मानवात दिला आहे.
मन, बुद्धी, चित्त व अंहकार असलेल अंतकरण मानवाला दिलय.
मानवाला मिळालेली ही नररूपी रत्नाची खाण आहे.
अस अत्यंत दुर्लभ असा देह ज्यात
कृतज्ञता, अस्मिता, भावमयता व कृतीप्रणवता
हे चार विशेष गूण आहेत
असा देवाने दिलेला देहाचा कसा वापर करायचा.
संत महात्मे म्हणतात *मनुष्यपन तरी साधी नारायण*
असा देवाची प्राप्ती करून देनारा मानवी देह देवादिकांना कळाला पन मिळाला नाही.
पशु पक्षांना मानवदेह मिळालाही नाही व कळालाही नाही.
साधु संताना मिळालाही व कळालाही
म्हणून तर ते म्हणतात
मनुष्य देहा ऐसे निध !

साधाल ते साधा सिद्ध !
करूनी प्रबोध !
संत पार उतरले !!

साधुसंत गेले आनंदी राहीले !

 हरिनामे झाले कृतकृत्य !!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण
    महाराष्ट्राच्या_मातीवर_समतेचे आणि ममतेचे जे संस्कार झाले ते वारकरी संप्रदायामुळे आणि पांडुरंग परमात्मा या महनीय दैवतामुळे.म्हणूनच आपण पहातो की,सामान्य माणूस खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन ज्ञानोबा-तुकाराम,विठोबा-रखुमाई आणि या विठ्ठलाचे अभंग गात गात शेकडो मैल जमीन पायी चालत आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येतो.आणि मनोमन सुखावून जातो. #आषाढी कार्तिकी विसरू नका मज।सांगतसे गुज पांडुरंग। असं स्वतः परमात्मा सांगतोय अस संतवचन आहे.असंख्य भक्तांच्या मानसिक सुखाचं हे माहेरघर आहे.वारकरी संप्रदाय हा समता विचारानं भरलेला आहे.संताच्या वाङमयात सुद्धा समतेच्या विचाराला प्राधान्य दिसून येते.एका अर्थान आपण असही म्हणू शकतो की वारकरी संप्रदाय हा समतेची मशाल हाती घेऊन अवघ्या विश्वाच्या अंधारलेल्या मनात प्रकाश पाडीत प्रवास करीत आहे.आणि याचा प्रत्यय हा आषाढी-कार्तिकीच्या वेळी भारतातल्या आणि भारताबाहेरूनही येणारी जी लोकगंगा चंद्रभागेला येऊन मिळते तेव्हा येतो.वारकरी पंथाच्या या महाद्वारातून कोणत्याही जातीचा आणि वर्णाचा भक्त पांडुरंगाची भेट घेऊ शकतो.वारकरी पथांची विचारसरणी विश्वाला महान शिकवण देणारी आहे. हिथे जातीपातीचा नाही तर भक्तीचा विचार होतो.माऊलींची सुंदर ओवी आहे,
म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण।

हे आघवेचि या अकारण।
एथ अर्जुना माझेपण।
सार्थक एक।
#जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

सत्य_तु_सत्य_तु_सत्य_तु

सत्य_तु_सत्य_तु_सत्य_तु
श्रीविठ्ठल
एका
सत्याचाच सार्‍या विश्वाला आधार असतो.
नित्य एकरस, अविकारी व अधीनाशी असणे हेच सत्याचे लक्षण आहे.
कर्तव्यरूप स्वधर्म पालनाने सत्याची प्राप्ती होऊ शकते.
शम, दम,समता,क्षमा, तितीक्षा ,मत्सराचा अभाव, असूया , त्याग, ईश्वर निष्ट धैर्य व अंहिसा यागुणांच्या योगाने सत्य प्रगट होते.
अशा सत्याचा उदय ज्याच्या अंतकरणात झाला आहे त्यांना प्रचिती आलेली असते
*सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला*
त्यांच्याकरवी या ईश्वरी जगताच्या अकल्याणाचे कार्य कधीच घङू शकत नाही.
कारण
या परम सत्याला शांतीचे अधिष्ठान असते

अशा
सत्याची प्रभा मगंल असते.
त्यायोगेच त्यांच्या व इतरांच्याही आयुष्याची संध्याकाळही मगंलच होत असते.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/