🌺।। श्री विठ्ठल ।।🌺
#मोहळा_मक्षिका_गुंतली_गोडीसी.....
आपले साधूसंत आपल्याला देहाला कष्ट द्यायला सांगत नाहीत. नामस्मरणासारखा साधा, सोपा मार्ग ते आपल्याला दाखवतात.
मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी ।
तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा ।
रामनाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी काया क्लेश उपवास पारणें ।
नाम संकीर्तनें कार्यासिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांतीं नाम जपे श्रीराम ।
तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥
मधमाशी ही ज्याप्रमाणे मधाच्या मोहळात गुंतून पडते, त्याचप्रमाणे माणसाने नामात गुंतले पाहिजे. मधमाशीला मधाचा गोडवा चाखावासा वाटतो. त्याचप्रमाणे माणसाला नामाची गोडी चाखावीशी वाटली पाहिजे. पन हातात जपमाळ घेऊन नाम जपण्याऐवजी , नामस्मरणाचे प्रदर्शन मांडण्याऐवजी मनातल्या मनात नाम जपावे.
रामनाम जर माणसाने असे आवडीने घेतले तर आजूबाजूच्या जगाच्या मोहबंधनातून तो लगेच मुक्त होईल,
उपवास करणे हे देखील देहाला उगीच कष्ट देणे होय. एक दिवस उपवासाच्या नावाखाली खूप खाणे किंवा अजिबात न खाणे या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. आदल्या दिवशी गोडधोड खातो. यालाच आपण उपवासाचे पारणे म्हणतो. हे निव्वळ आपल्या जिभेचे चोचले पुरवणे आहे. त्याचा खर्या आध्यात्माशी संबंध नाही. नाम संकीर्तनाने सर्व कार्यसिद्धी होत असेल तर उपवास, पारणे या गोष्टी कराव्यातच कशाला?
चोखोबाराय म्हणतात की ,जो कोणी एकांती आणि लोकांती रामनाम घेईल, तो निष्काम होईल म्हणजे त्याला कोणतीही इच्छा राहणार नाही. आपणही उगाच देहाला क्लेश न देता रामनाम घेणे हिताचे ठरेल.
#जय_जय_मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/